West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड विजयानंतर संपूर्ण राज्यात परिवर्तनाचे वातावरण आहे. या राजकीय उलथापालथीचा पहिला परिणाम आसनसोलमध्ये पाहायला मिळाला. स्थानिक तणावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कुलूपबंद असलेले येथील एक प्रसिद्ध दुर्गा मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. श्री श्री दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चालवले जाणारे हे मंदिर आता केवळ सणासुदीलाच नाही, तर वर्षभर दर्शनासाठी खुले राहणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे उधाण आले आहे.
भाजपाच्या विजयानंतर 'मंदिर आश्वासन' पूर्ण
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने 293 पैकी 206 जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवले आहे. विशेष म्हणजे आसनसोल ज्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यात येते, तिथल्या सर्व 9 विधानसभा जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. आसनसोल उत्तर मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार कृष्णेंदू मुखर्जी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एक महत्त्वाचे आश्वासन दिले होते.
#WATCH | A Durga temple, managed by the Shri Shri Durgamata Charitable Trust in West Bengal's Asansol, reopened to devotees after remaining shut for several years.
— ANI (@ANI) May 5, 2026
BJP leader Agnimitra Paul won the Asansaol Dakshin seat with a margin of 40,839 votes. pic.twitter.com/CojN84s6mp
आपण निवडून आल्यास वर्षांनुवर्षे बंद असलेले हे मंदिर भाविकांसाठी पूर्ण वेळ खुले करू, असा शब्द त्यांनी दिला होता. विजयी होताच त्यांनी मंदिरात जाऊन हे आश्वासन पूर्ण केले आणि मंदिराचे दरवाजे उघडले.
📍Video of the Day 🔥
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) May 5, 2026
After years of closure, a Durga Mandir in Asansol's Bastin Bazar is reopened by BJP workers. pic.twitter.com/BqI4bD8QV3
15 वर्षांच्या तृणमूल सत्तेचा अंत
यावेळच्या निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची जुनी सत्ता मुळापासून उखडून टाकली आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 147 आकडा पार करत भाजपने तब्बल 206 जागांवर ताबा मिळवला आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसला केवळ 80 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
या राजकीय धक्क्यामुळे बंगालच्या राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, सत्तेत झालेल्या या बदलाचे पडसाद आता स्थानिक पातळीवरही उमटू लागले आहेत.
( नक्की वाचा : Bengal Election 2026: बंगालमध्ये कमळ फुलताच मोदींना झाली 'त्यांची' आठवण; कोण होते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी? )
स्थानिक तणाव आणि प्रशासकीय निर्बंधांचा अडथळा दूर
आसनसोलमधील हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय निर्बंध आणि दोन समुदायांमधील तणावामुळे सर्वसामान्यांसाठी बंद होते. केवळ दुर्गा पूजा आणि लक्ष्मी पूजेच्या दरम्यानच या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी होती. मात्र, आता राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर आणि स्थानिक आमदारांच्या पुढाकारानंतर हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. मंदिर उघडताच मोठ्या संख्येने भाविक आणि कार्यकर्त्यांनी तिथे गर्दी केली होती.
( नक्की वाचा : Bengal election Result : बंगालमध्ये भाजपची सत्ता येताच 'हा' निर्णय लागू होणार; PM मोदींची दिल्लीतून मोठी घोषणा )
राजकीय बदलाचे धार्मिक प्रतीक
अनेक स्थानिकांसाठी मंदिराचे दरवाजे उघडणे ही केवळ धार्मिक बाब नसून, राज्यातील राजकीय बदलाचे एक मोठे प्रतीक मानले जात आहे. 15 वर्षांच्या सत्तांतरानंतर जनमानसात असलेल्या भावना आता अशा स्वरूपात बाहेर येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पश्चिम बंगालच्या कानाकोपऱ्यात भाजप कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात असून, आगामी काळात प्रशासकीय पातळीवरही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world