Delhi Assembly Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार? या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?

गेल्या दहा वर्षांपासून भाजप केंद्रात आहे, मात्र तरीही त्यांना दिल्लीतील गड भेदता आलेला नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत मतदान पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून भाजप केंद्रात आहे, मात्र तरीही त्यांना दिल्लीतील गड भेदता आलेला नाही. महाराष्ट्रानंतर आता भाजपकडून दिल्ली विधानसभेची प्लानिंग सुरू झालेली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती आहे. 10 वर्षापासून देशाचं तख्त सांभाळणारा भाजप 27 वर्षापासून दिल्ली विधानसभेच्या सत्तेपासून दूर राहिला आहे. त्यामुळे यंदा दिल्ली विधानसभेत भाजपचा दुष्काळ संपणार का? यासाठी भाजपकडून कोणती रणनीती आखली जात आहे, याबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. 

नक्की वाचा - Narendra Modi: हिंदू सेनेचा विरोध मोदींनी झुगारला, अजमेर दर्ग्याबाबत एक निर्णय अन् लाखोंची मनं जिंकणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 45 हजार कोटी कामाचं उद्घाटन करणार असल्याची माहिती आहे. पुढील 4 दिवसात पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या दिल्लीत 2 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोहिणीच्या जपानी पार्कमध्ये रॅली घेणार असून 4 हजार 500 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी सभा 5 जानेवारीला पूर्व दिल्लीच्या सीबीडी ग्राउंडवर होणार आहे.

Advertisement

दिल्ली विधानसभा निवडणुकीत कसं असेल भाजपचं संकल्पपत्र?

1 राजधानी दिल्लीत 300 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाण्याची शक्यता

 (आप सरकारकडून 200 युनिट वीज फ्री देते)

2 महिलांसह, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवा दिली जाण्याची शक्यता...

(दिल्लीत आप सरकारकडून सध्या महिलांना बस सेवा मोफत दिली जाते)

3 भाजप दिल्लीत लाडली बहिण योजना आणण्याची शक्यता

 (आप सरकारकडून दिल्लीत महिलांसाठी मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा)

4 आयुष्यमान योजना लागू करणार, तसंच गरिबांना मोफत उपचार दिले जाण्याची शक्यता
  (आप सरकारकडून दिल्लीत मोहल्ला क्लिनिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे)

5 भाजप दिल्लीत 20 हजार लीटर स्वच्छ पाणी मोफत देण्याची शक्यता

6 भाजप दिल्लीत 'जिथं झोपडी तिथं घर' या योजनेची घोषणा करण्याची शक्यता