ढाब्यापासून फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत सगळ्यांना हा नियम लावा! अभिनेत्याने केली जबरदस्त मागणी

Indian Food: भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. इथे खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत अनेक ढाबे आणि हॉटेल आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांनी लोक सभेमध्ये बोलताना एक जबरदस्त मागणी केली. किती रुपये मोजल्यावर किती वजनाचे किंवा आकाराचे अन्न मिळते याचं परिमाण निश्चित करावे आणि ते ठेल्यापासून ढाब्यापर्यंत आणि खानावळीपासून फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत लागू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. 

( नक्की वाचा: बदाम खाण्याची योग्य पद्धत काय? किती खावे, कधी खावे आणि कसे खावे? जाणून घ्या माहिती )

रवी किशन यांनी शून्य प्रहरात बोलताना म्हटले की, "भारत हा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. इथे खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत अनेक ढाबे आणि हॉटेल आहेत. या खाण्याच्या ठिकाणांवर अनेक लोकं जेवत असतात. या ढाबा, हॉटेल आणि फाईव्ह स्टारमधल्या खाण्याचे दर वेगवेगळे असतात. किती किमतीला किती वजनाचा किंवा आकाराचा पदार्थ मिळावा हे निश्चित नाहीये. काही ठिकाणी बारके समोसे मिळतात तर काही ठिकाणी मोठे समोसे मिळतात. या क्षेत्रात कोट्यवधी ग्राहक आहेत. या क्षेत्रासाठी कोणतेही नियम नाहीत आणि हे क्षेत्र असेच चालू आहे. मी मागणी करतो की कुठेही मिळणारा खाद्य पदार्थ असो, त्याचे मूल्य, गुणवत्ता आणि त्याची मात्रा निश्चित करण्यासाठी एक कायदा करणे गरजेचे आहे. एखाद्या ढाब्यावर डाळ तडका 100 रुपयांना मिळते तर दुसऱ्या ठिकाणी ती 120 रुपयांना मिळते तर तिसऱ्या ठिकाणी ती 400 रुपयांना मिळते. "

Advertisement

( नक्की वाचा: दारू आणि बिअरसोबत हा चकणा सर्वात हेल्दी, 99% लोकांना माहितीच नाही! )

खासदार रवी किशन यांनी सरकारला असा एक कायदा बनवण्याची मागणी केली आहे, ज्याद्वारे त्यांनी, मेन्यू कार्डवर किमतीसोबतच खाद्यपदार्थांच्या प्रमाणाचाही उल्लेख असावा,पदार्थ बनवण्यासाठी वापरलेल्या तेल किंवा तुपाचीही माहिती दिली जावी, आपण किती प्रमाणात अन्नासाठी किती पैसे देत आहोत, हे जाणून घेण्याचा ग्राहकाचा अधिकार आहे, या मागणीमुळे ग्राहकांना अधिक पारदर्शकता मिळेल आणि अन्नाची नासाडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. 

Advertisement