
अल्कोहोल अनेकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. अनेकजण तर पार्टीसाठी विकेंडची वाट पाहत असतात आणि शुक्रवारी रात्री दारू पार्टी करतात. दारूचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं आपल्याला माहीत आहे. मात्र तरीही दरवर्षी पिणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. दारू पित असताना चकणा काय असावा याचीही तयारी केली जाते. यामध्ये विविध पदार्थांचा समावेश असतो. अनेकदा यामध्ये तळलेल्या पदार्थांचाही समावेश असतो. आज आपण दारूसोबत कोणता हेल्दी चकणा खाऊ शकतो यावर बोलणार आहोत.
दारूसोबत शेंगदाणे खाणं योग्य की चूक?
अनेक बारमध्ये दारूसोबत भाजलेले शेंगदाणे फुकट दिले जातात. अनेकांना दारूसोबत शेंगदाणे खायला आवडतात. मात्र डॉक्टरांचं म्हणणं आहे की, चकणा म्हणून शेंगदाणे किंवा काजू खाणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि ब्लोटिंगसारखा त्रास होऊ शकतो. याशिवाय कोलेस्टेरॉलचा स्तर वाढू शकतो. दारूसोबत चटपटीत पदार्थ टाळायला हवेत. यातून शरीरातील पाणी कमी होतं. दारू प्यायल्याने आधीच शरीर डिहायड्रेट होतं, अशात असे पदार्थ खाल्ल्याने त्रास अधिक वाढू शकतो.
नक्की वाचा - प्रायव्हेट पार्टवरील केस काढायचे की नाही? 99% लोकांना सत्य माहीत नाही, डॉक्टर म्हणाल्या...
दारूसोबत पिझ्झा खाणं टाळायला हवं, यामुळे अॅल्कोहोलचं पचन धीम्या गतीने होतं. यासोबत छातीत जळजळ होण्याचा त्रासही होऊ शकतो.
दारूसह पनीर किंवा उच्च प्रथिनं असलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे पोटात जडपणा येतो.
अनेकजणं दारूसोबत तळलेले पदार्थ खातात. अशातून उलट्या होऊ शकतात आणि बराच काळ तुम्हाला त्रास होऊ शकतो.
हे पदार्थ उपयुक्त...
- शेंगदाणे किंवा मसालेदार पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही हिरवं सॅलड खाऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील डिहायड्रेशन टाळता येईल आणि नशा काही प्रमाणात कमी होईल. चकन्यात जास्त पाणी असलेल्या पदार्थांचा समावेश करा. मोड आलेली कडधान्यंही तुम्ही चकन्यात घेऊ शकतो.
- दारूसोबत तुम्ही भाजलेले मखाने किंवा पॉपकॉर्न खाऊ शकता. हे पदार्थ हेल्दी आहेत.
- फळांचं सॅलेडदेखील अल्कोहोलसोबत खाता येऊ शकतो. ज्यामध्ये सफरचंद, संत्री आणि केळी यांचा समावेश आहे हा एक चांगला पर्याय आहे.
- जेव्हा तुम्ही कोणताही चकणा तयार कराल, त्यात लिंबाचा वापर नक्की करा, त्यामुळे पचनास मदत मिळू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world