BJP President : भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी हालचालींना वेग, PM मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

BJP President : जानेवारी 2020 पासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ तीन वर्षांच्या मर्यादेपलीकडे वाढवण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

Political News : भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. बुधवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीत पक्षीय पुनर्रचना आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीवर चर्चा झाली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी. एल. संतोष उपस्थित होते. बैठकीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. या निवडणुकीबाबतची घोषणा पुढील आठवड्याभरात होऊ शकते.

(नक्की वाचा-  Water Crises : राज्यात पाणीटंचाई वाढली; 16 जिल्ह्यांत अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा)

मिळालेल्या माहितीनुसार , कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांसाठी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावावर चर्चा झाली. पक्ष पुढील दोन ते तीन दिवसांत पाच ते सहा राज्यातील प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

“भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया 20 एप्रिलनंतर कधीही सुरू होऊ शकते,”  अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक जानेवारीत होणे अपेक्षित होते. मात्र, एप्रिलचा मध्य उलटून गेला तरी अद्याप पर्यंत निवडणूक झालेली नाही. 

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai News : बायकोपासून बँकॉक ट्रिप लपवण्यासाठी नवऱ्याची भलतीच डेअरिंग; मुंबई एअरपोर्टवर अटक)

जानेवारी 2020 पासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ तीन वर्षांच्या मर्यादेपलीकडे वाढवण्यात आला होता. भाजपच्या संविधानानुसार, राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ सामान्यतः तीन वर्षांचा असतो.

Topics mentioned in this article