Saugat-e-Modi: ईदचे गिफ्ट 'सौगात ए मोदी किट', 32 लाख मुस्लिम बांधवांना फायदा, काय आहे योजना?

Saugat-e-Modi Kit: सौगात ए मोदी नावाने भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून मुस्लिम बांधवाना ईदी भेटवस्तू देण्यात येणार आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Saugat-e-Modi:  देशभरात सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र सन रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्टामध्ये गुढीपाडव्याच्या सणाची आणि मुस्लिम बांधवांमध्ये ईदची धामधुम अन् तयारी सुरु आहे. अशातच मुस्लीम बांधवांसाठी मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सौगात ए मोदी नावाने भाजपच्या अल्पसंख्यांक विभागाकडून मुस्लिम बांधवाना ईदी भेटवस्तू देण्यात येणार आहेत. 

ईदनिमित्त देशभरातील गरजू आणि गरीब मुस्लिम कुटुंबांना भाजप 'सौगत-ए-मोदी किट' नावाचे किट वाटणार आहे. भाजप देशभरात सौगत-ए-मोदी कार्यक्रम आयोजित करत आहे. सौगत-ए-मोदी कार्यक्रम भाजप अल्पसंख्याक आघाडीकडून आयोजित केला जात आहे. भाजपचा हा प्रयत्न समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मानला जात आहे. ज्यामार्फत 32 लाख बांधवांना हे कीट देण्यात येणार आहे. 

(नक्की वाचा-  CM Fadnavis : "विरोधी पक्षाला प्रशिक्षण द्यायला मी तयार आहे", CM फडणवीस विरोधकांवर बरसले)

सौगत-ए-मोदी या कार्यक्रमाची सुरुवात नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमाने झाली. भाजपकडून सौगत-ए-मोदी कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईतील २०० गरजूंना किट वाटण्यात आले. मंगळवारी दिल्लीतही असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय प्रभारी दुष्यंत कुमार गौतम त्यात उपस्थित होते. हा कार्यक्रम गालिब अकादमी बस्ती हजरत निजामुद्दीन येथे आयोजित करण्यात आला होता.

Budget Session 2025: 'महाराष्ट्रात एक नेपाळी...', अनिल परब असं काय बोलले? उद्धव ठाकरेही हसले

या मोहिमेअंतर्गत भाजप ज्या किटचे वाटप करत आहे त्यात अन्नपदार्थ, कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर यांचा समावेश असेल. महिलांसाठी असलेल्या किटमध्ये सलवार सूटसाठी साहित्य असेल, तर पुरुषांसाठी कुर्ता-पायजमासाठी साहित्य असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक किटची अंदाजे किंमत सुमारे 600 रुपये आहे. भाजपच्या या मोहिमेकडे गरीब आणि गरजू मुस्लिम कुटुंबांना मदत देण्याचा तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोच वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

Advertisement