
CM Devendra Fadnavis Sppech : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधकांच्या कामकाजाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिमटे घेतले. विरोधी पक्षाला मी प्रशिक्षण द्यायला तयार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अंतिम आठवडा प्रस्तावाचा टेक्स्ट तीन पानांचा आहे. एवढा मोठा टेक्स्ट याआधी कधी आला नव्हता. मात्र विरोधक अर्ध्याहून अधिक विषयांवर बोललेच नाहीत. गृहविभागाच्या प्रश्नांना मी सविस्तर उत्तरे दिली. मात्र तेच तेच प्रश्न पुन्हा विचारण्यात आले. मला असं वाटतं की विरोधी पक्षाला विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावं लागेल.
अंतिम आठवडा प्रस्तावात ज्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली नाही, अशा महत्त्वाच्या प्रश्नावंर चर्चा करण्याची संधी असते. मात्र तसं काही झालं नाही. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी ते द्यायला तयार आहे. गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेबांची मदत घ्यायला मी तयार आहे. सक्षम विरोधीपक्ष असणे हे लोकशाहीमध्ये महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षाची सक्षमता ही संख्येने ठरत नाही. भुजबळ साहेब एकटे होते. त्यावेळी योग्य विषय घेऊन सभागृह डोक्यावर घ्यायचे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- जयकुमार गोरे ब्लॅकमेलिंग प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचं नाव; CM देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)
अधिवेशनात बीडचं प्रकरण, कोरटकरचा प्रश्न असेल अशा अनेक विषयांवर विरोधक बोलले. मी गृहमंत्री असल्याने प्रत्येक गोष्टीचा संबंध माझ्याशी जोडला जातो. मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे, 2022 ते 2024 तुम्ही मलाच टार्गेट केलं. याचा परिणाम काय झाला. लोकांनी आम्हाला आधीपेक्षा जास्त बहुमत दिलं. त्यातून तुम्ही काही शिकलेच नाहीत, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
(नक्की वाचा- Political News : '2014 सालीच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता'; CM फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची कहाणी)
संविधान माझे सगे, 13 कोटी जनता सोयरे
कुठलीही घटना झाली की मला त्याचे सगेसोयरेच करतात, ही फॅशन झाली आहे. झालेल्या प्रत्येक प्रकरणात गृह विभागाने कडक कारवाई केली आहे. माझे सगेसोयरा अपराधी असेल तर त्याला शिक्षा द्यायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही. कारण माझे सगे देशाचं संविधान आहे आणि सोयरे 13 कोटी राज्यातील जनता आहे. जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world