BJP State List : 5 पैकी 3 राज्यात 'कमळ'राज; आता देशातील किती राज्यांमध्ये भाजपची सत्ता? ही आहे संपूर्ण यादी 

पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. भाजपने यंदा इतिहास रचला आहे आणि केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर अन्य दोन राज्यांमध्येही भगवा फडकवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

How many states BJP hold power? : पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. भाजपने यंदा इतिहास रचला आहे आणि केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर अन्य दोन राज्यांमध्येही भगवा फडकवला आहे. अशात भाजपने पाच पैकी तीन राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळवित सत्ता काबिज करणार असल्याचं चित्र आहे. 

पश्चिम बंगालमधील सत्तेसह भाजप आज आणखी एका राज्यात विजय मिळवून हॅट्रिक करीत आहे आणि ते राज्य म्हणजे आसाम. हिमंता बिस्वा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेला भाजप येथे सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. याशिवाय तिसरं राज्य म्हणजे पुद्दुचेरी. यावेळी ३० जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजप सुमारे २० जागांसह आघाडीवर असून काँग्रेसला ५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - ज्यांनी भाजपची पायाभरणी केली, त्यांच्या राज्यांत पहिल्यांदाच असं घडलं; 74 वर्षांनंतर भगवा फडकणार!

या 22 राज्यांमध्ये भाजप किंवा NDA चं सरकार

थेट भाजपचं सरकार...

१ उत्तर प्रदेश
२ मध्य प्रदेश
३ गुजरात
४ राजस्थान
५ हरियाणा
६ उत्तराखंड
७ आसाम (भाजपची वापसी)
८ अरुणाचल प्रदेश
९ त्रिपुरा
१० गोवा
११ छत्तीसगड
१२ ओडिसा
१३ मणिपूर
१४ दिल्ली
१५ आता पश्चिम बंगाल

NDA मित्रपक्षांसह सरकार

१६ बिहार
१७ महाराष्ट्र
१८ आंध्रप्रदेश
१९ सिक्किम
२० मेघालय
२१ नागालँड
२२ पुद्दुचेरी (युतीची वापसी)


बंगालचा विजय भाजपसाठी इतका महत्त्वाचा का आहे?

या यादीतील सर्वात नवं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे पश्चिम बंगाल. बंगालमध्ये गेल्या कित्येक दशकांपासून संघर्ष करीत होती. एक वेळ अशी होती जेव्हा निवडणुकीत भाजपचं खातंही उघडू शकत नव्हतं. मात्र आज भाजपने इतिहास रचला आहे. बंगाल केवळ राजकीयदृष्ट्याच नाही तर वैचारिकपणेही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ही भाजपचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमि आहे. या वर्षी भाजप त्यांची १२५ वी जयंती साजरी करीत आहे. अशात भाजप विजयी होणं म्हणजे पक्षासाठी वैचारिक घरवापसी केल्याचं मानलं जात आहे.