West Bengal Assembly Election Result 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालाचा कल हळूहळू समोर येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांच्या पहिल्या कलांमध्ये भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षे जुन्या सरकारला ब्रेक लागल्याचं चित्र आहे.
सात दशकांच्या मोठ्या वैचारिक वनवासानंतर भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत पहिल्यांदा त्यांचं स्वप्न साकार होणार आहे. मुखर्जी यांच्या विचारांवर भाजपची पायाभरणी करण्यात आली होती. त्यांनी १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना केली आणि काही वर्षांनी जनसंघाचं रुपांतर भाजपमध्ये झालं. १९८० मध्ये जनसंघाचं रुपांतर भाजपमध्ये करण्यात आलं. ज्या व्यक्तीने भाजपची (जनसंघ) स्थापना केली त्यांच्या राज्यात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुलणार आहे.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण झालं...
मीडियामधील निवडणूक निकालाच्या पहिल्या कलांनुसार, भाजप तब्बल २०० जागांवर लीड करीत आहे. तर टीएमसीने ९० जागांवर ब्रेक घेतल्याचं दिसून येत आहे. बंगालमध्ये भाजपचं हे यश श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नाशी जोडलं जात आहे. मुखर्जी हे वकील, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी होते, ज्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं. त्यांची क्षमता ओळखून, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा मंत्री म्हणून नियुक्त केलं.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी काँग्रेस केव्हा सोडली?
कलकत्त्यामध्ये १९०१ मध्ये जन्माला आलेले श्यामा प्रसाद मुखर्जी सर्वात कमी वयात कुलपति बनले होते. जेव्हा त्यांची कलकत्ता विद्यापीठात कुलपति म्हणून निवड करण्यात आली होती, त्यावेळी ते केवळ ३३ वर्षांचे होते. चार वर्षे ते या पदावर राहिले. बंगाली ब्राम्हण कुटुंबात जन्माला आलेले मुखर्जी यांचं राजकीय करिअर १९२९ मध्ये सुरू झालं. ते त्यावर्षी बंगाल काँग्रेसशी जोडले होते. पुढल्याच वर्षी म्हणजे १९३० मध्ये काही मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेस सोडली.
भाजपचे पितामह बनले श्यामा प्रसाद मुखर्जी...
१९३८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या कुलपति पदावरुन हटविल्यानंतर पुढल्या वर्षी म्हणजे १९३९ मध्ये ते बंगालमध्ये हिंदू महासभेत सामील झाले. १९४० मध्ये ते हिंदू महासभाचं अध्यक्ष बनविण्यात आलं. १९५१ मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जींनी भारतीय जनसंघाचं गठण केलं. हा तोच भारतीय जनसंघ आहे जो पुढे जाऊन सध्याचा भारतीय जनता पक्ष झाला. आता, मोदी आणि शाह पहिल्यांदाच मुखर्जींचे बंगालचे स्वप्न साकारताना दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world