सैफ अली खानने केले राहुल गांधींचं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाला?

मला वाटते की राहुल गांधींनी जे केले ते खूप प्रभावी आहे. कारण एक काळ होता जेव्हा लोक त्यांचे म्हणणे आणि त्यांची कृती गांभीर्याने घेत नव्हते. मला वाटते की त्याने खूप परिश्रम केले आणि ही परिस्थिती बदलली आहे, असं सैफ अली खान यांनी म्हटलं.

Advertisement
Read Time: 2 mins

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांनी कठोर परिश्रम करून लोकांची स्वतःबद्दलची धारणा बदलली आहे. गुरुवारी संध्याकाळी 'इंडिया टुडे मुंबई कॉन्क्लेव्ह 2024' या कार्यक्रमात बोलताना सैफ अली खानने म्हटलं की, मला निर्भीड आणि प्रामाणिक राजकारणी आवडतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यापैकी कोण भविष्यात भारताचे नेतृत्व करू शकतील, असे धाडसी राजकारणी कोण आहेत? असा प्रश्न सैफ अली खानला विचारण्यात आला होता. त्यावेळी सैफ अली खानने म्हटलं की, हे सर्व संयमी आणि धाडसी राजकारणी आहेत. राहुल गांधींबद्दल बोलातना सैफने म्हटलं की, ते जे करतात आणि जे बोलतात ते योग्य पद्धतीने घेतलं जात नाही. 

(नक्की वाचा-  आबा-काका गटात पून्हा संघर्ष ! रोहित पाटील आईसह पोलिस ठाण्यात, पुढे काय झालं?)

मला वाटते की राहुल गांधींनी जे केले ते खूप प्रभावी आहे. कारण एक काळ होता जेव्हा लोक त्यांचे म्हणणे आणि त्यांची कृती गांभीर्याने घेत नव्हते. मला वाटते की त्याने खूप परिश्रम केले आणि ही परिस्थिती बदलली आहे, असं सैफ अली खान यांनी म्हटलं.

मी कोणाचे समर्थन करतो यावर मी चर्चा करू इच्छित नाही. कारण मला माझ्या दृष्टिकोनात अराजकीय राहायचे आहे.  मला वाटते की देशाने आपले मत अगदी स्पष्टपणे व्यक्त केले आहे. मला आनंद आहे की भारतात लोकशाही अबाधित आहे आणि त्याची भरभराट होत आहे, असंही सैफ अली खानने म्हटलं. मी राजकीय नेता नाही आणि मला व्हायचे देखील नाही.  तसेच राजकारणात येण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचेही सैफने स्पष्ट केले.

(नक्की वाचा-  Beed News : सासऱ्याचा प्रेमविवाह, जात पंचायतीची सुनेला सात पीढ्या लक्षात ठेवतील अशी शिक्षा )

सोशल मीडियापासून दूर

सैफ अली खान सोशल मीडियापासूनही दूर आहे. याबाबत बोलताना त्याने म्हटलं की, नकारात्मतेपासून दूर ठेवण्यासाठी मी स्वत:ला सोशल मीडियापासून दूर ठेवतो. सोशल मीडिया लोकांचा महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवतो. इथे वेळ वाया घालवण्यापैक्षा तुम्ही एखादं चांगलं काम करु शकता.  करिनाने मला सांगितलं की, ही चांगली सवय नाही. मला देखील वाटलं की मी खूप वेळ वाया घालवला. त्यानंतर मी ते अॅप डिलीट करुन टाकलं, असं सैफ अली खानने म्हटलं. 

Topics mentioned in this article