जाहिरात

आबा-काका गटात पुन्हा संघर्ष ! रोहित पाटील आईसह पोलीस ठाण्यात, पुढे काय झालं?

या राडा प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून फिर्याद दाखल करून आली आहे. पूर्ण तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल,असे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी सांगितलं आहे.

आबा-काका गटात पुन्हा संघर्ष ! रोहित पाटील आईसह पोलीस ठाण्यात, पुढे काय झालं?
सांगली:

आर. आर. पाटील गट आणि संजय काका पाटील गट यांच्यातील वाद हा सर्वश्रूत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये आबा आणि काका गटात संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आर. आर. पाटील गटाच्या माजी उपनगराध्यक्षाला घरात घुसून मारहाण केली. असा आरोप आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटल यांनी केला आहे. शिवाय थेट कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन ही केलं. तर हा सर्व भंकपपणा असल्याचे संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजयकाका पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माजी उपनगराध्यक्ष आय्याज मुल्ला आणि त्यांच्या आईला मारहाण केली. असा आरोप आबा गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करावी,अशी मागणी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटल यांनी केली. त्यासाठी त्यांनी पोलीस स्थानकाबाहेरच ठिय्या आंदोलन ही केलं. कवठेमहांकाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुका पार पडत आहेत. अनेक  नगरसेवक आपल्या बाजूने येत आहेत. त्याच्यात रागातून हे कृत्य केल्याचा आरोपही रोहित पाटील यांनी केला आहे. या मतदारसंघात कोणत्याही प्रकारची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - अमित शहांचेही कापले होते तिकीट, त्यावेळचा किस्सा काय? अमित शहांनी स्वत: सांगितलं

दरम्यान संजयकाका पाटील यांनी या मारहाण प्रकरणी रोहित पाटील यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या स्वीय सहाय्यकाला आधी मारहाण करण्यात आली होती. त्याचा जाब विचारण्यास गेला असता,आरेरावाची भाषा झाली,यातून आपल्या कार्यकर्त्यांनी आय्याज मुल्ला यांच्या कानशीलात लगावली. ते आपण नाकारत नाही. पण काही भंपक लोक त्याचं राजकारण करत आहेत, असा आरोप संजयकाका पाटल यांनी केला. शिवाय मतदार संघात कोणताही दडपशाही नाही असंही ते म्हणाले. केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व केले जात आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'मी विधानसभेत दिसणार' निलेश राणेंच्या घोषणेनं कोणाचा पत्ता कट होणार?

संजयकाका पाटील यांनी केलेल्या खुलासावरून रोहित पाटील यांनीही पलटवार केला आहे. त्यांच्या पीएला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नाही. शिवाय या मतदारसंघात आता माफिया विरुद्ध सर्वसामान्य असा संघर्ष सुरू झाला आहे. आपल्यावर भंपक म्हणून टीका केली म्हणून आपण भंपक होत नाही. शिवाय भंपक कोण आहे, हे लोकसभेला जनतेने दाखवून दिले आहे असा टोलाही त्यांनी या निमित्ताने लगावला. शिवाय आगामी विधानसभेतही तुम्हाला तुमची जागा दाखवून देवू असे रोहित पाटील म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

दरम्यान या राडा प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून फिर्याद दाखल करून आली आहे. पूर्ण तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल,असे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ साळुंखे यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान आबा काका गटातील हा संघर्ष आणखी तिव्र होवू शकतो. याबाबत पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. रोहित पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर लोकसभेला पराभव झाल्याने विधानसभेची नव्याने तयारी संजयकाका पाटील करत आहेत. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
खान्देशच्या राजकारणाचे भीष्म पितामह, अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक; रोहिदास पाटील काळाच्या पडद्याआड
आबा-काका गटात पुन्हा संघर्ष ! रोहित पाटील आईसह पोलीस ठाण्यात, पुढे काय झालं?
Bollywood actor Saif Ali Khan praised Congress leader Rahul Gandhi
Next Article
सैफ अली खानने केले राहुल गांधींचं भरभरून कौतुक, नेमकं काय म्हणाला?