पाकिस्तानची सीमा ओलांडत भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणात आला. सीमा सुरक्षा बलाने अर्थात BSF ने हा प्रयत्न हाणून पाडला आहे. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार जम्मू कश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये 8 मे रोजी रात्री 11 वाजता एका मोठ्या घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.
पाकिस्तानने भारतावर हवाई मार्गाने हल्ला करण्याचा गुरुवारी रात्री प्रयत्न केला होता. ANI ने विविध सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेने पाकिस्तानी हवाई दलाचे एक जेट विमान पाडले आहे. पंजाबमधील पठाणकोट सेक्टरमध्ये हे विमान पाडण्यात आले आहे. मात्र या वृत्ताला सरकारकडून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही.
नक्की वाचा : Viral Video : खासदार रडतायत, जनता शिव्या देतेय; पाकिस्तान्यांची जाम टरकलीय
जम्मू कश्मीरच्या नौशेरा भागामध्ये पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आल्याचे कळते आहे, मात्र यालाही अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू करण्यात आला होता. याला भारतानेही चोख उत्तर दिलं. हा गोळीबार सुरू असतानाच हा ड्रोन पाडण्यात आला.
नक्की वाचा : पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय सैन्याकडून सडेतोड उत्तर, वाचा 10 मोठे अपडेट्स
पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. हे तीनही तळ भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ आहेत. या हल्ल्याला भारताने तत्काळ उत्तर दिले असून या हल्ल्यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
भारतीय सैन्य दल पाकिस्तान्यांना उत्तर देत असतानाच दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांसोबत बैठक घेतली आणि सीमेवरील तयारीचा आढावा घेतला. पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईलच्या सहाय्याने हल्ला सुरू केल्यानंतर भारताची सज्जता काय आहे याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. पाकिस्तानने जम्मू आणि राजस्थानातील सतवारी, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि जैसलमेर इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात भारतीय सैन्य दलाने हा हल्ला परतवून लावला होता.