
मुंबई:
पाकिस्ताननं गुरुवारी रात्री भारताच्या पश्चिम आणि उत्तर भागातील सिमेवर अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. पण, यापैकी एकही हल्ला यशस्वी झालेला नाही. भारतीय सैन्यानं या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरी तणाव लक्षात घेता राजस्थानवरील सिमावर्ती जिल्ह्यांना प्रशासनानं रेड अलर्ट घोषित केला आहे.
- सैन्य अधिकाऱ्यानं सांगितलं की, पाकिस्ताननं जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमधील सैन्यांच्या ठिकाणांन लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी ड्रोनला प्रभावी पद्धतीनं उत्तर दिलं. त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे सिमावर्ती जिल्हे, कच्छ आणि बनासकांठामधील अनेक भागांमध्ये ब्लॅक आऊट लागू करण्यात आले होते. कच्छ आणि बनासकांठा हे दोन्ही जिल्हे पाकिस्ताननच्या सीमेला लागून आहेत.
- पाकिस्तानची कोणतीही आक्रमक कृती रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भूज, नलिया, नखत्राणा आणि गांधीधामसह अनेक ठिकणांना ब्लॅक आऊट करण्यात आले. त्यांनी सांगितले की बनासकांठा जिल्ह्यातील सुईगाम तालुक्यातील सीमाभागातील अनेक गावांमध्ये ब्लॅक आऊट घोषित करण्यात आले.
- यापूर्वी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवरा गावाजवळ एका दुर्गम ठिकाणी 'ड्रोन' सारख्या वस्तूचा ढिगारा सापडला होता. हा भाग भारत आणि पाकिस्तान सीमेजवळ आहे.
- राजस्थानच्या सीमावर्ती जैसलमेर जिल्ह्यात सुमारे तासभर प्रचंड गोळीबाराचे आवाज ऐकू आले. एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जैसलमेरमध्ये जोरदार गोळीबार ऐकू आला आणि सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत.
- पोलिसांनी सांगितले की, काही काळ शांत झाल्यानंतर पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. बाडमेरमध्येही अनेकदा सायरन वाजवण्यात आले. राज्याच्या संपूर्ण पश्चिम भागात काळवंडले असून सुरक्षा दल सतर्क आहेत.
- आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढता तणाव पाहता प्रशासनाने राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये 'रेड अलर्ट' जारी केला आहे. गंगानगर जिल्ह्यात पोलिसांनी ‘रेड अलर्ट' जारी करून नागरिकांना घरातच राहून दिवे बंद करण्यास सांगितले आहे.
- पोलिसांनी 'X' वर लिहिले, 'रेड अलर्ट आहे, सर्वांनी आपापल्या घरात राहावे, सर्व प्रकारचे दिवे बंद ठेवावे.' ब्लॅकआऊटच्या काळात इन्व्हर्टर आणि जनरेटरचे दिवे बंद ठेवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंजू यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
- बारमेरमध्ये सलग पाचव्यांदा रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ, जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर ठिकाणी सायरन वाजले. जैसलमेर शहरात ब्लॅकआउट सायरन वाजला. सूत्रांनी सांगितले की, ब्लॅकआऊटसोबतच जैसलमेरमध्ये स्फोटही झाले. जैसलमेर-पोकरणमध्ये पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे हे स्फोट झाले.
- बिकानेरमध्येही पूर्णत: ब्लॅक आऊट करण्यात आले होते. जिल्हाधिकारी नम्रता वृष्णी यांनीही बिकानेर तहसीलमध्ये ब्लॅकआउटचे आदेश जारी केले . पुढील आदेश येईपर्यंत हा ब्लॅकआउट सुरू राहणार आहे. जोधपूरमध्येही जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world