मोठी घोषणा! विद्यार्थ्यांमधून घडणार 'इन्फ्लुएन्सर्स'! 15000 शाळांमध्ये सरकार उभारणार कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स

Budget 2025-26: सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) च्या माध्यमातून देशभरातील 15000 माध्यमिक शाळा आणि 500 प्रमुख कॉलेजांमध्ये 'कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स' (Content Creator Labs) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बदलत्या काळाची पावले ओळखून केंद्र सरकारने आता औपचारिक शिक्षणासोबतच डिजिटल शिक्षणावर मोठा भर दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026 मध्ये भारताला जगाचे 'कॉन्टेंट हब' बनवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. 'क्रिएटर इकॉनॉमी'ची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन, सरकारने विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्ये विकसित करण्यासाठी 15000  शाळा आणि 500 कॉलेजांमध्ये 'कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स' उभारण्याची घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की, देशाला 2030 पर्यंत 20 लाख सोशल मीडिया प्रोफेशनल्सची गरज आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) च्या माध्यमातून देशभरातील 15000 माध्यमिक शाळा आणि 500 प्रमुख कॉलेजांमध्ये 'कॉन्टेंट क्रिएटर लॅब्स' (Content Creator Labs) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

(नक्की वाचा- Union Budget 2025-26: चीनच्या 'दादागिरी'ला भारताचे उत्तर! एका घोषणेने संरक्षण , EV क्षेत्राला मिळणार मोठी ताकद)

'क्रिएटर इकॉनॉमी'साठी नवा आराखडा

या लॅब्स केवळ वर्गखोल्या नसून ते आधुनिक तंत्रज्ञानाचे केंद्र असतील. विद्यार्थ्यांना व्हिडिओ एडिटिंग, पॉडकास्टिंग, स्क्रिप्ट रायटिंग आणि ग्राफिक डिझाइनिंगसाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उपलब्ध करून दिले जातील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या लॅब्सच्या निर्मितीवर देखरेख ठेवेल आणि अभ्यासक्रम निश्चित करेल. पदवीसोबतच विद्यार्थ्यांकडे डेटा ॲनॅलिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंगचे व्यावहारिक कौशल्य असावे, हा सरकारचा उद्देश आहे.

गेमिंग आणि AI क्षेत्राला मिळणार उभारी

अर्थसंकल्पात केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर गेमिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. गेमिंग क्षेत्रात 10 लाख नवीन नोकऱ्या* निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. डिझाइन शिक्षणासाठी नवीन नॅशनल डिझाइन शाळा उघडल्या जातील.  कॉन्टेंट निर्मिती अधिक प्रभावी करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाईल.

Advertisement

(नक्की वाचा-  Budget 2026 : मुंबई-पुणे, पुणे-हैद्राबाद प्रवास अतिजलद होणार! अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा)

डिजिटल एथिक्स आणि कमाई

विद्यार्थ्यांना केवळ कॉन्टेंट बनवणेच शिकवले जाणार नाही, तर त्यांना डिजिटल एथिक्स, कॉपीराईट कायदे आणि आपल्या कॉन्टेंटमधून मोनेटायझेशन म्हणजेच कमाई कशी करायची, याचेही धडे दिले जातील. यामुळे ग्रामीण भागातील तरुणही जागतिक ब्रँड्ससोबत जोडून घेऊन घरबसल्या उत्पन्न मिळवू शकतील.