CBSE 12th Result 2025 : महाराष्ट्र बोर्डानंतर CBSE 12 वीचा निकाल जाहीर, पुणे विभागातील 90.93% विद्यार्थी उत्तीर्ण

CBSE Board 12th Result : सीबीएसई  बारावीच्या परीक्षेत 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीपेक्षा काहीसे जास्त आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

CBSE Board 12th Result  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल जाहीर झाल्यानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) बारावीचा निकालही समोर आला आहे. सीबीएसई  बारावीच्या परीक्षेत 88.39 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, जे गेल्या वर्षीच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीपेक्षा काहीसे जास्त आहे. याशिवाय सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी मुलांपेक्षा 5 टक्के जास्त गुण मिळवले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि 88.39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 0.41% ने वाढले आहे. मुलींनी मुलांपेक्षा 5.94% हून जास्त गुणांनी बाजी मारली आहे. 91% पेक्षा जास्त मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.

नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

सीबीएसई बोर्डाचा निकाल कुठे पाहाल?
सीबीएसई बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर निकाल पाहू शकता. आधी या संकेतस्थवर जा. यानंतर होमपेजवरील रिझल्ट सेक्शनवर क्लिक करा. Class X) Results 2025 किंवा Class XII Results 2025 घोषित झाल्यावर (सक्रिय झाल्यानंतर) वरील लिंकवर क्लिक करा. आता विद्यार्थ्यांनी रोल नंबर, स्कूल नंबर किंवा अॅडमिट कार्ड आईडी दाखल करा. यानंतर सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचा रिझल्ट स्क्रीन दिसेल. 

Advertisement

CBSE Result 2025: विभागनिहाय निकाल पाहा..
विजयवाड़ा: 99.60% विद्यार्थी उत्तीर्ण
त्रिवेन्द्रम: 99.32%
चेन्नई: 97.39%
बेंगलुरु: 95.95%
दिल्ली पश्चिम: 95.37%
दिल्ली पूर्व: 95.06 %
चंडीगढ़: 91.61%
पंचकुला: 91.17%
पुणे: 90.93%
अजमेर: 90.40%
भुवनेश्वर: 83.64%
गुवाहाटी: 83.62%
देहरादून: 83.45%
पटना: 82.86%
भोपाल: 82.46%
नोएडा: 81.29%
प्रयागराज: 79.53%