जाहिरात

SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

Maharashtra Board SSC 10th Result 2025 : यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त ९९.३२ टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाव सर्वात कमी 82.67 टक्के इतका लागला आहे. 

SSC Result Maharashtra Board : लातूरमधील विद्यार्थ्यांची झिरो ते हिरो कामगिरी, दहावीच्या निकालानंतर होतेय चर्चा

Maharashtra Board MSBSHSE SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र दहावीचा (इयत्ता 10वी) निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यातील 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त 99.32 टक्के इतका लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाव सर्वात कमी 82.67 टक्के इतका लागला आहे. 

राज्यातील 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 92.31 इतकी आहे. राज्यातील एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लातूरची झिरो ते हिरो कामगिरी...

यंदा बारावीच्या निकालात लातूर पॅटर्नला फारसं यश मिळू शकलं नव्हतं. मात्र दहावीच्या परीक्षेत लातूर पॅटर्नची कामगिरी पाहायला मिळाली आहे. लातूर पॅटर्नच्या १०० विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क मिळाले आहेत. राज्यातील एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असताना यामध्ये लातूरच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लातूरमधील ११३ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क मिळाले आहेत. पुण्यातील १३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत, तर मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या तीन इतकी आहे. 

SSC Result Maharashtra Board : दहावीचा निकाल लागला, 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींचीच बाजी!

नक्की वाचा - SSC Result Maharashtra Board : दहावीचा निकाल लागला, 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; यंदाही मुलींचीच बाजी!

एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण

नागपूर ३
संभाजी नगर ४०
मुंबई ८
कोल्हापूर १२
अमरावती ११
नाशिक २
लातूर ११३
कोकण ९

यंदा राज्यातील ४९ शाळांचा निकाल ० टक्के लागला आहे. यामध्ये लातूरच्या शाळा सर्वाधिक १० शाळा आहे. या दहा शाळेतील एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही.  

४९ शाळांमध्ये ० टक्के निकाल 

पुणे ७ शाळा 
नागपूर ८ शाळा 
संभाजीनगर ९ शाळा 
मुंबई ५ शाळा 
कोल्हापूर १ शाळा 
अमरावती ४ शाळा 
नाशिक ४ शाळा 
लातूर १० शाळा 
कोकण १ शाळा


राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.२२ टक्के तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ९०.७८ टक्के इतका लागला आहे. राज्यातील ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागाचा समावेश आहे. ज्यामध्ये ९६.८७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विभागातील ९५.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण तर पुणे विभाग चौथ्या क्रमांकावर असून ज्यामध्ये ९४.८१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


२८५ विद्यार्थी काठावर पास 

राज्यातील २८५ विद्यार्थ्यांना मिळाले ३५ टक्के गुण 

पुणे ५९
नागपूर ६३
संभाजी नगर २८
मुंबई ६७
कोल्हापूर १३
अमरावती २८
नाशिक ९
लातूर १८
कोकण ०

राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वात जास्त  निकाल ९९.३२ टक्के तर गडचिरोली जिल्ह्याचा सर्वात कमी निकाल ८२.६७ टक्के तर पुणे जिल्ह्याचा निकाल ९७.२६ टक्के लागला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com