CCTV Footage : जोरदार आवाज झाला अन् भिंत कोसळली, शाळेत विद्यार्थ्यांची पळापळ

School Wall Collapse : वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोडवर असलेल्या नारायणी गुरुकुल शाळेत ही घटना घडली. शुक्रवारी 19 जुलै रोजीची ही घटना आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
School wall Collapse CCTV Footage:

गुजरातमधील वडोदरा येथे शाळेची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटना घडली त्यावेळी मुले वर्गात उपस्थित होती. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.

वर्गात मुले बसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर अचानक वर्गाच्या भिंतीचा एक भाग कोसळला. त्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांची धावपळ झाली. भिंत बडल्याननंतर काही बाक देखील जमिनाचा काही भाग खचल्याने बाहेर पडले. 

घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनाने सांगितले होते की, ज्या वर्गात भिंत पडली त्या वर्गात एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता. पण शाळा व्यवस्थापनाचा खोटारडेपणा व्हिडीओतून समोर आला आहे. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही. केवळ एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया रोडवर असलेल्या नारायणी गुरुकुल शाळेत ही घटना घडली. शुक्रवारी 19 जुलै रोजीची ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर शाळेच्या संचालकांनी घटनास्थळी विद्यार्थी नसल्याचे सांगितले होते.

घटनेनंतर शाळेतील शिक्षकही धावत आले आणि विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर सुरक्षित बाहेर काढले.  शाळेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. अशात शाळेची भिंत कोसळली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article