जाहिरात
This Article is From May 09, 2024

महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; कुटुंबांची बचत 9 लाख कोटींनी घटली

वस्तूंच्या किमती वाढल्याने घरखर्चाचे गणित भागत नसल्याने कुटुंबांकडून केल्या जात असलेल्या बचतीवरही विपरित परिणाम होत आहे.

महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट;  कुटुंबांची बचत 9 लाख कोटींनी घटली
नवी दिल्ली:

एप्रिल महिन्यात आलेल्या एक नामांकित संस्थेच्या सर्वेक्षणानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांसाठी राम मंदिर, हिंदुत्व आणि भ्रष्टाचार या भावनिक मुद्द्यांपेक्षा महागाई आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे महत्त्वाचे असल्याचं समोर आलं आहे. सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलिपग सोसायटीज' (सीएसडीएस) या नामांकित संस्थेने लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली होती. आता याचीच प्रचिती सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. 

वस्तूंच्या किमती वाढल्याने घरखर्चाचे गणित भागत नसल्याने कुटुंबांकडून केल्या जात असलेल्या बचतीवरही विपरित परिणाम होत आहे. मागील तीन वर्षात कुटुंबांकडून केल्या जाणाऱ्या घरगुती बचतीत तब्बल 9 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून हे समोर आलं आहे.

नक्की वाचा - निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; विजय करंजकरांचा शिंदे गटात प्रवेश

वार्षिक आधारावर विचार केला असता गेल्या पाच वर्षात कुटुंबांच्या घरगुती बचतीचा हा निच्चांक ठरला. 2020-21 या वर्षात कुटुंबांच्या बचतीने 23.29 लाख कोटींचा उच्चांक गाठला होता आणि बचतीत सातत्याने घट होत आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजाही तीन वर्षात वाढला आहे. 2022-23 या वर्षात कुटुंबांवरील बँकांचे कर्ज 11.88 लाख कोटी इतके झाले. 2020-21 या वर्षात त्यांच्यावरील बँकांचे कर्ज 6.05 लाख कोटी इतके होते.

उसनवारी तब्बल 73 टक्क्यांनी वाढली 
महागाई वाढल्याने रोजचा घरखर्च आणि इतर बिले भागवण्यासाठी अनेक कुटुंबांना उसनवारीचा मार्ग पत्करावा लागला आहे.2022-23 या वर्षात उसनवारी तब्बल 73 टक्क्यांनी वाढली. 2021-22 या वर्षात उसनवारीची टक्केवारी 9 लाख कोटी होती. हीच देणी 15.6 लाख कोटींवर गेली आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com