किशोर बेलसरे, प्रतिनिधी
कडाक्याचा उन्हाळा आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीच्या पिकांवर परिणाम झाला आहे. परिणामी फळभाज्या आणि पालेभाज्यांमधील दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. उन्हामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. उत्पादनात घट झाल्याने पालेभाज्या आणि फळं भाज्यांचे भाव गगनाला भिडले असून या भाववाढीने कुटुंबाचं बजेट कोलमडलं आहे. गेल्या 15 दिवसात भाज्यांच्या दरात तीन पटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर नेमके कसे आहेत, ते जाणून घेऊया..
- 10 ते 20 रुपये असलेली कोथिंबीर 50 ते 60 रुपये
- 10 ते 20 रुपये असलेली मेथी 60 ते 70 रुपये
- 20 ते 30 रुपये असलेली कांदापात 60 ते 70 रुपये
- 5 रुपये असलेला पालक 20 ते 25
- 20 रुपये किलो असलेली मिरची 80 रुपये किलो
- 25 रुपये किलो असलेला टॉमेटो 60 ते 90 रुपये किलो
- 30 रुपये किलो असलेली भेंडी 80 रुपये किलो
- 30 रुपये किलो असलेले वांगे 50ते 60 रुपये किलो
- 40 रुपये किलो असलेले कारले 80 रुपये किलो इतका भाव झाला आहे.
नक्की वाचा - बघतोस काय रागाने...! पाहणे-शिवीगाळीवरून चोघांमध्ये झाला वाद व पुढे घडली हादरवणारी घटना
वरील सर्व दर हे नाशिकच्या बाजारातील आहेत. मात्र मुंबईत आल्यानंतर यात अधिक वाढ पाहायला मिळते. गेल्या 15 दिवसात भाज्यांच्या किमतीत तीन पटीने वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. पालेभाज्या या लवकर खराब होतात. त्यामुळे वाढलेल्या किमतीबरोबरच भाज्यांची क्वालिटी फारशी चांगली नसल्याचं दिसून येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world