BJP vs Congress : संसद परिसरातील अभूतपूर्व गदारोळानंतर लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

संसद भवन धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बासुरी स्वराज यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

संसदेच्या परिसरात काँग्रेस आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. संसद परिसरात झालेल्या या अभूतपूर्व गोंधळानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुरुवारी संसद भवन परिसरात झालेल्या गोंधळानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शन करता येणार नाही अशा सूचना सर्व खासदारांना दिल्या आहेत. कोणतीही अडवणूक किंवा निदर्शन न करण्याची सक्ती घालण्यात आली आहे. 

संसद भवन धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार अनुराग ठाकूर आणि बासुरी स्वराज यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

(नक्की वाचा- हत्येचा प्रयत्न, धमकी आणि...; राहुल गांधींविरोधात FIR दाखल, ती 6 कलमं कोणती?)

राहुल गांधींवर आरोप काय? 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधींविरोधात ओडिशातील बालासोरचे भाजप खासदार प्रताप सारंगी आणि उत्तर प्रदेशातील फर्रुखाबादमधील भाजप खासदार मुकेश राजपूत यांना धक्का दिल्याचा आरोप आहे. भाजप खासदारांनी त्यांच्याविरोधात सहा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रत्युत्तरात काँग्रेस खासदारांनी तक्रार दाखल केली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कुणी केला? अमित शाह यांनी 15 उदाहरणांनी काँग्रेसला दिलं उत्तर)

राहुल गांधी यांच्यावर लावलेली कलमं कोणती? 

कलम 109 : हत्येचा प्रयत्न करणे
कलम 117 : जाणून बुजून दुखापत पोहोचवणे
कलम 115 : दुखापत करण्याच्या उद्देशाने कृत्य करणे
कलम 3 (5) : सामुहिक पणे गुन्हा करणे
कलम 125 : खाजगी सुरक्षेला जोखीम मध्ये टाकणे 
कलम 131 : धक्का देणे आणि भिती घालणे
कलम 351 : धमकी देणे

Topics mentioned in this article