Wife Filed For Divorce After Chatgpt Reveals Husbands Affair: आर्टिफिशियल इंटेलिजेन्समुळे महिलेने आपल्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीसमधील ही अजब घटना समोर आली आहे. नवऱ्याच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळवण्यासाठी महिलेने एआयची मदत गेतली. त्यानंतर महिलेने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ग्रीसमधील एका महिलेने ChapGPT च्या आधारे तिच्या पतीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. महिला गेल्या दहा वर्षांपासून विवाहित होती आणि ती दोन मुलांची आई देखील आहे. महिलेने पारंपरिक 'कॉफी रीडिंग' डिजिटल स्वरूपात पाहण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने स्वतःचे आणि तिच्या पतीचे 'कॉफी कपचे फोटो' ChapGPTला पाठवले.
(नक्की वाचा- एण्ट्रीवर डीजवाल्याने चुकीचे गाणं लावल्याने नववधू भडकली, VIRAL VIDEO पाहून लोक म्हणाले- बरं झालं!)
ChapGPT कडून आलेल्या उत्तराने महिलेला धक्का बसला. ChapGPT ने सांगितले की तिच्या नवऱ्याचे एका तरुणीशी संबंध आहेत. या संबंधामुळे कुटुंब अडचणीत येऊ शकते. एआयकडून महिलेच्या विश्वासघात आणि कौटुंबिक अस्थिरतेची माहिती दिली.
महिलेला काही दिवसांपासून तिच्या पतीच्या वागण्यात बदलही जाणवत होता. तिला संशय होता की तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असू शकतात. त्याच्या संशयाची पुष्टी करण्यासाठी तिने ही पद्धत तपासली. त्यानंतर ChapGPT दिलेलं उत्तर खरे मानून महिलेने तिच्या पतीला घराबाहेर काढले आणि मुलांनाही घटस्फोटाबद्दल सांगितले. त्यांतर महिलेने पतीला 'कायदेशीर नोटीस' पाठवली.
(नक्की वाचा- Qatar Vs UAE: W,W,W..., अख्खा संघ रिटायर्ड आऊट,17 फलंदाज शून्यावर बाद, क्रिकेटच्या मैदानात अजब घडलं!)
नवऱ्याला सगळा प्रकार सुरुवातील गंमत वाटली. मात्र घडलेल्या प्रकाराने नवऱ्याला धक्का बसला. पतीच्या वकिलाने स्पष्टपणे सांगितले की एआय कॉफी रीडिंगला न्यायालयात वैध पुरावा मानले जाऊ शकत नाही. हा एक वैयक्तिक गैरसमज आहे. या घटनेतून अधोरेखित होते की, एआयचा अतिवापर किती धोकादायक ठरु शकते.