Child Lost 1 Crore In KBC : 'कौन बनेगा करोडपती 17'व्या सीजनमध्ये सहभागी झालेल्या पाचवीत शिकणारा इशित भट्ट प्रकाशझोतात आला आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्याने उद्धटपणे संवाद साधल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. मला नियम शिकवू नका, असं म्हणणाऱ्या या मुलाला केबीसीमधून रिकाम्या हाती जावं लागलं आहे. इशितची वागणूक सभ्य नसल्याने त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. पण असं पहिल्यांदाच घडलं नाहीय.तर दोन वर्षांपूर्वीही सीजन 15 मध्ये 8 वर्षांच्या विराट अय्यरनेही असंच काहीसं केलं होतं. जेव्हा तो एक कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला, पण अतिआत्मविश्वासाला बळी पडून त्याने 47 लाख रुपये गमावले होते.
1 कोटींचा प्रश्न बनला नुकसानीचं कारण
वर्ष 2023 मध्ये 'कौन बनेगा करोडपती' सीजन 15 च्या एका एपिसोडमध्ये 8 वर्षांचा विराट हॉटसीटवर बसला होता. शाळेत त्याला गुगल बॉय असं म्हटलं जायचं. त्याने या खेळात त्याच्या तल्लख बुद्धीची झलक दाखवली होती. तो प्रश्नांची अचूक उत्तरे देत 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. पण इथेच त्याने अतिआत्मविश्वासात मोठी चूक केली. एक कोटी रुपयांचं प्राईज न जिंकल्याने त्याचे आई-वडिलही नाराज झाले होते.
प्रश्न होता : आवर्त सारणी (पीरियॉडिक टेबल) मध्ये 96 आणि 109 परमाणु संख्या असणाऱ्या दोन तत्वांचा नावाचं वैशिष्ट्य काय आहे?
ऑप्शन होते :
A) नोबेल पुरस्कार विजेतांच्या नावावर
2) महिला शास्त्रज्ञांच्या नावावर
3) भारतीय शास्त्रज्ञांच्या नावावर
4) त्यांचे कोणतेच नाव नाहीत..
नक्की वाचा >> Video : पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियमबाहेर तुफान राडा! प्रेक्षकांनी केली दगडफेक, PAK vs SA सामन्यात काय घडलं?
चुकीच्या उत्तरामुळे 47 लाख गमावले
विराटकडे कोणतीच लाईफलाईन उरली नव्हती. त्याने (A) म्हणजेच नोबेल पुरस्कार विजेतांच्या नावावर..हा ऑप्शन निवडला होता.पण योग्य उत्तर होतं, (B) महिला शास्त्रज्ञांच्या नावावर..या चुकीमुळे त्याला 3 लाख 20 हजार रुपयेच जिंकता आले. जर त्याने क्विट केलं असतं, तर तो 50 लाख रुपये जिंकला असता..अमिताभ बच्चन यांनी नाराज होत म्हटलं होतं की,जर विराटला उत्तर माहित नव्हतं, तर त्याला क्विट करायचं होतं. अमिताभ बच्चन यांनी विराटच्या बुद्धीचं कौतुकही केलं होतंं. पण एका चुकीमुळे विराटने 47 लाख रुपये गमावले होते.
नक्की वाचा >> Palghar CCTV Video : ऑफिसला लवकर पोहोचण्याची घाई नडली! धावत्या ट्रेनमध्ये चढताना तरुणीचा पाय घसरला अन् नंतर..