Cobra Snake CPR Viral Video : कडक उन्हाळा केवळ माणसांनाच नाही तर जंगल आणि आजूबाजूला राहणाऱ्या जीव-जंतुसाठीही जीवघेणा ठरत आहे. यातच एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. येथे एक कोब्रा सापाला वाचविण्यासाठी सर्पमित्राने मोठे प्रयत्न केले. त्याला सीपीआरदेखील दिल्याचं समोर आलं आहे. मात्र शेवटी कोब्रा सापाचा जीव वाचवता आला नाही. ही घटना वाढत्या उष्णतेच्या धोकादायक परिणामांविषयी एक मोठा इशारा म्हणून समोर आली आहे.
भीषण उष्णतेमुळे कोब्र्याचा मृत्यू...
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील अंजडजवळ ग्राम दवानामध्ये एक कोब्रा सापाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. परिसरातील वाढतं तापमान आणि पाण्याच्या कमतरतेमुळे साप अत्यंत अशक्त झाला होता. उष्णता इतकी जास्त होती की, सापाला शरीराचं संतुलन राखता आलं नाही आणि बेशुद्ध झाला.
तेज गर्मी अब सिर्फ इंसानों को ही नहीं, बल्कि जंगल और आसपास रहने वाले जीव-जंतुओं के लिए भी जानलेवा साबित हो रही है. बड़वानी जिले से एक दिल छू लेने वाला मामला सामने आया है, जहां एक कोबरा सांप को बचाने के लिए सर्प मित्र ने पूरी कोशिश की, यहां तक कि उसे सीपीआर भी दिया गया, लेकिन… pic.twitter.com/C9VMp0DuRo
— NDTV MP Chhattisgarh (@NDTVMPCG) May 24, 2026
सर्पमित्राने सापाला वाचविण्याचा केला प्रयत्न...
स्थानिकांनी जेव्हा सापाची अवस्था पाहिली तेव्हा तातडीने तलवाडा डेबमधून सर्प मित्र निलेश उपाध्याय याला घटनास्थळी बोलावलं. सर्प मित्र घटनास्थळी दाखल झाला आणि सापाला वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. सर्पमित्राला कोब्रा सापाला सीपीआरदेखील दिला. मात्र तरीही सापाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सापांसारखे सरपटणारे प्राणी शीत रक्ताचे असतात. त्यांचे शरीर बाहेरील तापमानावर अवलंबून असतं. त्यामुळे, जेव्हा तापमान खूप वाढतं, तेव्हा ते त्याचा सामना करू शकत नाहीत. उष्णतेची लाट त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि काहीवेळा ती जीवघेणीसुद्धा ठरू शकते.
सर्पमिक्ष निलेश उपाध्याय यांनी लोकांना आवाहन केलं आहे की, उन्हाळ्यात केवळ माणसांसाठीच नाही तर पशू-पक्षी आणि अन्य प्राण्यांसाठीही पाण्याची व्यवस्था करा. जर तुम्हाला एखादा जखमी किंवा आजारी प्राणी दिसला तर, वन विभागाला किंवा संबंधित पथकाला तत्काळ कळवा. वाढती उष्णता आणि बदलत्या हवामानाचा प्रत्येक सजीवावर परिणाम होत असल्याचा हा प्रसंग एक स्पष्ट इशारा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world