जाहिरात

Commercial LPG Cylinder: महागाईचा भडका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ

Commercial LPG Cylinder Price Hike Today: 1 एप्रिल 2026 पासून 19 किलोच्या व्यावसायिक (Commercial) एलपीजी सिलेंडरच्या दरात 195.50 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे.

Commercial LPG Cylinder: महागाईचा भडका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ

Commercial LPG Cylinder Price Hike Today: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. मिडल ईस्टमध्ये (मध्य पूर्व) वाढत्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ जाहीर केली आहे.

कमर्शियल सिलेंडरच्या दरात 195.50 रुपयांची वाढ

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2031 रुपये झाली आहे. 1 मार्च रोजी 114.50 रुपयांची वाढ झाल्यानंतर, आज पुन्हा 195.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल गॅस महागल्यामुळे हॉटेलिंग, केटरिंग आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!)

घरगुती गॅस आणि इंधन दर स्थिर

व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्या असल्या तरी, घरगुती ग्राहकांसाठी सध्या दिलासा आहे. घरगुती गॅसच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 7 मार्च रोजी 60 रुपयांच्या वाढीनंतर याची किंमत सध्या 913 रुपये इतकी स्थिर आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही सध्या स्थिर आहेत. 

मिडल ईस्ट संकटाचा जागतिक परिणाम

इराण-इस्रायल संघर्षा मुळे ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विनिमय दरांच्या आधारे तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला किमतींची समीक्षा करतात. जागतिक बाजारात तेलाच्या किमती 50 टक्क्यांनी वधारल्याने ही दरवाढ अनिवार्य असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com