देशात दसऱ्यापूर्वी नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. सणासुदीच्या काळात आज, 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
आज, 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या या सिलेंडरच्या दरात 15.50 रुपये ते 16 रुपयांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. या दरवाढीमुळे रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांना फटका बसणार आहे.
(नक्की वाचा- 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत हे 7 नियम, रेल्वे तिकीट ते UPI काय होणार बदल? वाचा एका क्लिकवर)
19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर
- दिल्ली - 1595.50 रुपये
- मुंबई - 1547.00 रुपये
- कोलकाता - 1700 रुपये
- चेन्नई - 1754 रुपये
घरगुती LPG सिलेंडरचे आजचे दर
14.2 किलोग्रॅम वजनाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑईलच्या आकडेवारीनुसार, मुंबईत घरगुती दर 852.50 रुपये तर पुण्यात हे दर 856.00 रुपये आहेत.