जाहिरात

Big News: 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत हे 7 नियम, रेल्वे तिकीट ते UPI काय होणार बदल? वाचा एका क्लिकवर

ऑनलाइन गेमिंगपासून ते ईपीएफमध्येही या महिन्यात बदल होणार आहेत.

Big News: 1 ऑक्टोबरपासून बदलणार आहेत हे 7 नियम, रेल्वे तिकीट ते UPI काय होणार बदल? वाचा एका क्लिकवर
मुंबई:

New Rule in October2025: ऑक्टोबर महिन्या हा सर्व सामान्यांसाठी महत्वाचा आहे. या महिन्यात सण तर आहेच पण अनेक गोष्टी आणि नियम ही याच महिन्यात बदलत आहेत. या थेट परिणाम सर्व सामान्यांच्या दैनंदीन गोष्टीवर होणार आहे. 
देशभरात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. यातील महत्वाचा बदल म्हणायचा झाल्यास  पेन्शन प्रणालीचा आहे. तिथे आता गुंतवणूकदार एकाच पॅन क्रमांकावरून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकणार आहे. याशिवाय, ऑनलाइन गेमिंगपासून ते ईपीएफमध्येही या महिन्यात बदल होणार आहेत. त्यामुळे या महिन्यात कोणते सात मोठे बदल होणार आहेत त्यावर एक लक्ष टाकूयात.  

रेल्वे तिकीट बुकिंग 
ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये 1 ऑक्टोबर 2025 पासून मोठा बदल होणार आहे.  ऑनलाईन बुकींगमध्ये सुरुवातीची 15 मिनिटे फक्त त्या प्रवाशांना मिळतील, ज्यांचं IRCTC खातं आधारशी जोडलेले आहे. शिवाय पूर्णपणे ऑथेंटिकेटेड (fully authenticated) असेल. हा नियम तत्काळ तिकीट बुकिंगप्रमाणे तयार करण्यात आलेला आहे. यामुळे दलाल आणि एजंट्सच्या मनमानीवर लगाम बसणार आहे. त्यामुळेच हा बदल करण्यात आला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

ऑनलाइन गेमिंग
1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगच्या दुनियेत मोठा बदल होणार आहे. हे नवीन नियम लागू होण्याआधी सरकारनं गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर संबंधितांशी चर्चा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मंजुरी ही दिली आहे. नव्या नियमांचा उद्देश ऑनलाइन गेमिंगला जास्त सुरक्षित आणि पारदर्शक बनवणं आहे. जेणेकरून ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांना फसवणुकीपासून वाचवता येणार आहे. शिवाय कंपन्यांवरही कठोर नियंत्रण ठेवता येणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

UPI मध्ये ही बदल 
यूपीआय (UPI)चा वापर करणाऱ्यांनाही एका बदलाला समोरे जावं लागणार आहे. नव्या नियमा नुसार तुम्ही फोन पे (PhonePe), गुगल पे (GPay) आणि इतर कोणत्याही पेमेंट अॅपवरून तुम्हाला तुमच्या मित्र, कुटुंबिय किंवा कोणत्याही व्यक्तीकडे पैसे मागू शकणार नाही. यूपीआयचे "कलेक्ट रिक्वेस्ट" किंवा "पुल ट्रान्झक्शन" हे फीचर पूर्णपणे बंद केलं जाणार आहे. हे तेच फीचर आहे, ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाकडे तरी पेमेंटची रिक्वेस्ट पाठवून पैसे मागू शकत होता. ऑनलाइन फसवणूकीपासून बचाव करण्यासाठी एनपीसीआयनं हे पाऊल उचललं आहे. यातून यूपीआय व्यवहार सुरक्षित होणार आहेत. 

Latest and Breaking News on NDTV


PF खातेधारकांसाठी मोठा निर्णय 
ऑक्टोबर महिन्यात PF खातेधारकांना सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. ज्यांचे पीएफ अकाऊंट आहे अशा लोकांना त्यांच्या पीएफ अकाऊंटमधून  एटीएमच्या माध्यमातून थेट पैसे काढता येणार आहेत. शिवाय किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून पंधराशे ते अडीचशे रुपयांपर्यंत वाढवण्यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. यासोबतच, ऑक्टोबरमध्ये EPFO आपली नवीन डिजिटल सेवा 'EPFO 3.0' सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Latest and Breaking News on NDTV

LPG सिलिंडरच्या किमती 
1 ऑक्टोबर 2025 रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दर महिन्यात हा बदल अपेक्षित असतो. गेल्या महिन्यात सिलिंजरचा दर 1631 रुपयांवरून कमी होऊन 1580 रुपये झाला होता. मात्र, नुकताच जीएसटी दर कमी झाल्यानंतरही गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या नव्हत्या हे ही विसरून चालणार नाही. 

Latest and Breaking News on NDTV

NPS मध्ये मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क 
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDA ने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली  NPS मध्ये एक मोठा बदल केला आहे. जो  1 ऑक्टोबरपासून लागू होईल. या बदलाला 'मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क' असं नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत, आता गैर-सरकारी क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि गिग वर्कर्स एकाच पॅन क्रमांकाद्वारे अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतील. त्यासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे सेवानिवृत्तीचं नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.

Latest and Breaking News on NDTV

पॅन क्रमांकावर अनेक योजनांमध्ये गुंतवणूक शक्य 
आता पीएफआरडीएच्या नवीन मल्टीपल स्कीम फ्रेमवर्क (MSF) अंतर्गत एक पॅन क्रमांकावरून वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. यापूर्वी फक्त एकाच योजनेत गुंतवणुकीची परवानगी होती. पण आता गुंतवणूकदार त्यांच्या गरजेनुसार  जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पर्याय निवडण्यासाठी स्वतंत्र असतील. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूकीचा मार्ग ही मोकळा होणार आहे. शिवाय जास्त परतावा मिळवू इच्छिणारे गुंतवणूकदार 100% इक्विटी आधारित योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतात.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com