LPG Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडर दरात मोठी वाढ, चेक करा नवे दर

Commercial LPG Price Hike: व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG) किमतीत 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांचे बजेट कोलमडणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

LPG Price Hike: मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तेल विपणन कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 993 रुपयांची विक्रमी वाढ जाहीर केली आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली असून, व्यावसायिक ग्राहकांसाठी हे मोठे संकट मानले जात आहे.

मोठ्या शहरांमधील व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर 

  • दिल्लीत  993 रुपयांची वाढ होऊन आता किंमत 3,071.50 रुपये  झाली आहे. पूर्वी ही किंमत 2,078.50 रुपये होती.
  • मुंबईतही  993 रुपयांची वाढ होऊन आता किंमत 3,024 रुपये  झाली आहे. पूर्वी ही किंमत 2,031 रुपये होती. 
  • कोलकाता येथे नवीन व्यावसायिक सिलिंडरे दर 3,202 रुपये  झाली आहे. 
  • चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 3237 रुपये मोजावे लागतील.

(नक्की वाचा-  Pune News: पुण्यात 'बंट्या' गोळ्यांचा मोठा साठा जप्त, 'फुलचंद पान' कनेक्शनमुळे खळबळ)

घरगुती सिलिंडर ग्राहकांसाठी दिलासा 

व्यावसायिक दरात मोठी वाढ झाली असली, तरी घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.  दरम्यान, गॅस बुकिंगमधील अंतराबाबतचे नवीन नियम आजपासून लागू झाले असून, शहरी भागात दोन बुकिंगमध्ये 25 दिवसांचे अंतर असणे बंधनकारक आहे.

Advertisement

दरवाढीचे कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच 'स्ट्रॅट ऑफ हॉर्मुझ' मधील मालवाहतुकीवर लादण्यात आलेल्या अतिरिक्त करांमुळे आयात खर्च वाढला आहे, ज्याचा परिणाम थेट व्यावसायिक गॅस दरांवर दिसून येत आहे.

(नक्की वाचा-  Vinod Kambli: विनोद कांबळीच्या संघर्षाचा आईस्क्रीम कंपनीकडून सौदा? सोशल मीडियावर तीव्र संताप, काय आहे प्रकरण?)

व्यावसायिक गॅस महागल्यामुळे बाहेरचे जेवण महाग होण्याची दाट शक्यता आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याची शक्यता असून, यामुळे सामान्यांचे बाहेर खाणे आता अधिक खर्चिक होणार आहे.
 

Topics mentioned in this article