Congress-BJP Workers Clash: लाठ्या-काठ्यांसह दगडांनी हल्ला, भाजप-काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काँग्रेसचा झेंडा लावलेला एक व्यक्ती एका व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • A man was arrested for hurling abuses at PM Modi and his mother during Rahul Gandhi's Bihar rally
  • The accused was caught wearing a Congress flag at the event
  • BJP filed a case and demanded an apology from Congress over the incident
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चात भाजप आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. राहुल गांधी यांच्या 'व्होटर अधिकार यात्रे'दरम्यान झालेल्या या घटनेमुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात काँग्रेसचा झेंडा लावलेला एक व्यक्ती एका व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरताना दिसत आहे. 'मतदारांच्या हक्कांची चोरी' झाल्याचा आरोप करत काढलेल्या या रॅलीदरम्यान हा प्रकार घडला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आणि काँग्रेसकडून माफीची मागणी केली. याप्रकरणी भाजपने पाटणा येथे राहुल गांधी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

(नक्की वाचा-  Mohan Bhagwat : PM मोदींच्या निवृत्तीचं नेमकं काय होणार? सरसंघचालक मोहन भागवतांनी दिलेलं उत्तर चर्चेत)

भाजपने या अपमानाचा निषेध करत जोरदार आंदोलन पुकारले. यावेळी भाजप नेते नितीन नवीन यांनी काँग्रेसला 'जशास तसे' उत्तर देण्याचा इशारा दिला. "बिहारचा प्रत्येक मुलगा आईचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला योग्य उत्तर देईल. आम्ही याचा बदला घेऊ," असे ते म्हणाले. त्याला उत्तर देताना एका काँग्रेस कार्यकर्त्या डॉ. आशुतोष यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, "आम्ही सत्ताधारी पक्षाला योग्य उत्तर देऊ, कारण यात सरकारचा हात आहे. नितीश कुमार चुकीचे करत आहेत."

(नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )

Advertisement

आरोपीला अटक

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. दरभंगा पोलिसांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून माहिती दिली की, अपशब्द वापरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. "या प्रकरणी सिंदरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येत आहे," असे पोलिसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Topics mentioned in this article