जाहिरात

Shashi Tharoor's Son : 'मला नोकरीवरुन काढून टाकलं'; काँग्रेस खासदार शशी थरूरच्या मुलाची भावुक पोस्ट

ईशानने एक पोस्ट करीत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. 

Shashi Tharoor's Son : 'मला नोकरीवरुन काढून टाकलं'; काँग्रेस खासदार शशी थरूरच्या मुलाची भावुक पोस्ट

Congress MP Shashi Tharoor's son has been fired from his job : काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा मुलगा ईशान थरूर याला नोकरीवरुन काढण्यात आलं आहे. ईशान थरूर हा अमेरिकन वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्टमध्ये पत्रकार म्हणून काम करीत होता. ईशानने एक पोस्ट करीत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. ईशान थरूर याच्यासह अनेक पत्रकारांनाही द वॉशिंग्टन पोस्टने नोकरीवरुन काढलं आहे. ईशानसह ३०० जणांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं आहे. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्र संस्थेने मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या कपातीची घोषणा केली आहे. ज्याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय कव्हरेज आणि स्पोर्ट्स डेस्कवर झाला आहे. 

ईशानचा भावुक करणारा मेसेज...

बुधवारी ईशान थरूरसह अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर भावुक करणारा मेसेज शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी जगातील सर्वात प्रभावशाली वृत्तसंस्थांपैकी एक असलेल्या या कर्मचारी कपातीला 'दुःखद क्षण' असं वर्णन केलं आहे. सोशल मीडियावर एक्सवरील पोस्टमध्ये ईशान थरूरने लिहिलंय, वॉशिंग्टन पोस्टच्या अधिकांश इंटरनॅशनल कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर ते अत्यंत निराश झाले आहेत. त्यांनी लिहिलंय, आज मला वॉशिंग्टन पोस्टमधून काढून टाकण्यात आलं आहे. मी अत्यंत दुखी आहे. जवळजवळ १२ वर्षांपासून माझे मित्र आणि सहकारी असलेले संपादक आणि पत्रकारांसोबत काम करणे हा एक सन्मान होता. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी रिकाम्या न्यूजरूमचा फोटो शेअर केला आणि लिहिलंय, 'एक वाईट दिवस.'

नक्की वाचा - New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल


ANI ने फॉक्स न्यूजच्या हवाल्याने सांगितलं, ही कपात मोठ्या पुनर्रचनेनंतर झाली. ज्याअंतर्गत स्पोर्ट्स डेस्क बंद केला आणि इंटरनॅशनल रिपोर्टिंग कमी करण्याचा निर्णय घेतला. वृत्तांनुसार, वृत्तपत्रातील साधारण एक तृतीयांश कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झाला आहे. मीडिल ईस्ट, युरोप, आशिया आणि लॅटिन अमेरिकेसह अनेक भागातील वरिष्ठ रिपोर्टस आणि एडिटर्सनी नोकरी गमावली आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com