भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या हजाराच्या पुढे गेली आहे. देशात सध्या एक हजार दहा कोरोनाचे सक्रिय रुग्ण नोंदवले असून केरळमध्ये सर्वाधित 430 रुग्णांची नोंद आहे.
दक्षिण भारतातून सुरू झालेला हा संसर्ग आता दिल्ली आणि उत्तर भारताकडे सरकत आहे. एका आठवड्यात दिल्लीत 99 आणि गुजरातमध्ये 83 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 430 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील 69 नवीन रुग्णांपैकी 37 रुग्ण मुंबईत आहेत, तर कर्नाटकात 47 रुग्ण आढळले आहेत आणि एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
बातमी अपडेट होत आहे.