Corona patients Number : देशात कोरोनाची रुग्णसंख्या 4 हजारांवर; कोणत्या राज्यात किती रुग्णसंख्या?

गेल्या 1 जानेवारीपासून आतापर्यंत देशात कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत 4,026 प्रकरणे समोर आली असून कर्नाटकात 24 तासांत 58 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये 59 आणि पश्चिम बंगालमध्ये 41 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. गेल्या 24 तासांत देशात 65 नवीन रुग्ण सापडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यनिहाय सक्रिय रुग्णांची संख्या:  

केरळ - १,४१६  
महाराष्ट्र - ४९४  
दिल्ली - ३९३  
गुजरात - ३९७  
पश्चिम बंगाल - ३७२  
कर्नाटक - ३११  
तमिलनाडू - २१५  
उत्तर प्रदेश - १३८  
राजस्थान - ७५  
पुद्दुचेरी - २७  
आंध्र प्रदेश - २८  
हरियाणा - ४४  
मध्य प्रदेश - २१  
ओडिशा - १५  
झारखंड - ११  
गोवा - ८  
जम्मू-काश्मीर - ९  
छत्तीसगड - ११  
पंजाब - ९  
आसाम - ६  
बिहार - ११  
सिक्कीम - ४  
अरुणाचल प्रदेश - ०  
तेलंगणा - ४  
उत्तराखंड - ३  
मिझोराम - २  
चंदीगड - २  

Advertisement

नक्की वाचा - Purandar Airport: पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी शासकीय नोटीस, नव्या गावांमध्ये हालचाली सुरु!

मागील २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला  असून मृतांमध्ये केरळमधील ८० वर्षीय वृद्ध, महाराष्ट्रात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ७० आणि ७३ वर्षीय वृद्ध महिलांचा समावेश आहे. तामिळनाडूत ६९ वर्षीय महिला आणि पश्चिम बंगालमध्ये ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ज्या लोकांचा मृत्यू झाला, ते कोरोना आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त होते. 

१ जानेवारीपासून आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात १०, केरळमध्ये ९, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी ४, तामिलनाडूत ३, उत्तर प्रदेशात २, बंगाल, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू  झाला. आतापर्यंत २,७०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१२ कोविड रुग्ण बरे झाले आहेत. मागील १२ दिवसांत ३,७०० हून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत.