जाहिरात

सीताराम येचुरींनी पार्थिव केले हॉस्पिटलला दान, वाचा काय आहेत बॉडी डोनेशनचे नियम

सीताराम येचुरींनी पार्थिव केले हॉस्पिटलला दान, वाचा काय आहेत बॉडी डोनेशनचे नियम
मुंबई:


Sitaram Yechury Passes Away : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे  CPI(M) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं गुरुवारी (12 सप्टेंबर) रोजी दीर्घ आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, दिल्ली (AIIMS Delhi) मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. येचुरींच्या कुटुंबीयांनी त्याचे पार्थिव एम्सला दान करण्याचा निर्णय घेतला आहे. येचुरी यांचा मृतदेह विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी तसंच संशोधनासाठी वापरला जाणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा उपयोग व्हावा ही खरोखरच उदात्त संकल्पना आहे. येचुरींप्रमाणेच अनेकांनी हा पर्याय स्वीकारला आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांच्या मृतदेहाचा उपयोग झाला आहे, हे तुम्ही वाचले असेल. या पद्धतीनं मृतदेह दान करण्याचे नियम काय आहेत? हे अनेकाना माहिती नसतं. याबाबतचे नियम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहेत मृतदेह दान करण्याचे नियम?

आपल्या देशात मृतदेह दान करण्याचे मुख्य दोन नियम आहेत. पहिला नियम म्हणजे कोणतीही व्यक्ती ती जीवंत असताना शरीराचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकते. दुसरा नियम म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह दान करण्याचा निर्णय त्याचे कुटुंबीय घेऊ शकतात. 

( नक्की वाचा : इंदिरा गांधींसोबत व्हायरल होत असलेल्या सीताराम येचुरी यांच्या फोटोचं सत्य काय? )
 

मृतदेह दान केल्यानंतर काय होतं?

बॉडी डोनेशननंतर पार्थिवचा वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी होतो. विशेषत: पहिल्या वर्षांच्या मुलासाठी शरीराच्या अवयवांची माहिती दिली जाते. काही दिवस/काही महिन्यानंतर मृतदेह खराब होऊ लागतो त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांची परवानगी असेल तर तो त्यांना परत मिळतो. त्याचबरोबर मृतदेहाचा वापर करणारी संस्था देखील त्यावर अंत्यसंस्कार करतात. त्यानंतर कुटुंबीयांची इच्छा असेल तर त्यांच्या अस्थी त्यांना दिल्या जातात. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
iPhone 16 सीरिजची प्री-बुकिंग आजपासून सुरू, कंपनीकडून जबरदस्त discount offer
सीताराम येचुरींनी पार्थिव केले हॉस्पिटलला दान, वाचा काय आहेत बॉडी डोनेशनचे नियम
arvind-kejriwal-gets-bai- supreme-court-bail-conditions
Next Article
दिलासा की धक्का? केजरीवाल तुरूंगातून सुटले पण 'या' गोष्टींत अडकले