Congress Worker Murder : हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ

Rohtak Congress Worker Murder Case: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हिमानी नरवाल सक्रिय होत्या. हिमानी यांच्या इन्स्टाग्राम आयडीवर राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांचे फोटो आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rohtak Congress worker Murder Case: काँग्रेसच्या महिला नेत्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना हरियाणाच्या रोहतकमधून समोर आली आहे. हिमानी नरवाल असं महिला नेत्याचं नाव आहे. एका सूटकेसमध्ये हिमानी यांचा मृतदेह आढळून आला आहे. याच मुद्यावरून काँग्रेसने भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. काँग्रेस आमदार भूषण बत्रा यांनी हिमानी यांचाच हा मृतदेह असल्याचं म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेत सहभागी

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत हिमानी नरवाल सक्रिय होत्या. हिमानी यांच्या इन्स्टाग्राम आयडीवर राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांचे फोटो आहेत. रोहतकमध्येही हिमानी दीपेंदर हुड्डा आणि भूपिंदर हुड्डा यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय होत्या. रोहतकचे काँग्रेस आमदार बीबी बत्रा यांनी हिमानीच्या हत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांचं ट्वीट

हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या घटनेनंतर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांची ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. भूपिंदर हुड्डा यांनी ट्वीट करत म्हटलं की, "रोहतकमध्ये सक्रिय काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांच्या निर्घृण हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. अशा प्रकारे एका मुलीची हत्या आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडणे हे अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरील कलंक आहे. या हत्येची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि सरकारने पीडितेच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी."

(नक्की वाचा-  Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार)

हातावर मेहंदी

शनिवारी सकाळी सांपला शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ एका बंद सूटकेसमध्ये एका मुलीचा मृतदेह आढळल्याचे वृत्त मिळाले होते. मुलीच्या हातावर मेहंदी होती. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसही चौकशीसाठी आले. पण मुलीच्या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.

Advertisement

(नक्की वाचा - BJP News: भाजपच्या बड्या नेत्याचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, पण शेवटची इच्छा बोलून दाखवली)

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम आणि ओळखीसाठी रोहतक पीजीआयमध्ये ठेवला. त्यानंतर काँग्रेस आमदार भूषण बत्रा यांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यांनी सांगितले की हा मृतदेह काँग्रेसची कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.