बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवं चक्रीवादळ येणार असल्याची माहिती आहे. या चक्रीवादळाला शक्ती हे नाव देण्यात आलं आहे. श्रीलंकाने या चक्रीवादळाला नाव दिल्याचं सांगितलं जात आहे. 23 मे ते 29 मेदरम्यान शक्ती चक्रीवादळ भयानक रुप घेऊ शकतं. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
24 ते 25 मेदरम्यान लँडफॉल होण्याची शक्यता आहे. या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान ओडिसा, बंगाल आणि बांग्लादेशावर परिणाम होऊ शकतो. हे चक्रीवादळ बंगालच्या किनाऱ्यावरुन बांग्लादेशातील खुलनाला हिट करू शकतं. भारतीय हवामान विभागानुसार, या महिन्यात तीन दिवस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यापैकी एकाचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होईल. सरकारने स्थानिक प्रशासनाला याबाबत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
नक्की वाचा - Pre Monsoon News : पूर्व मान्सूनला सुरुवात; महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर होणार दाखल
मुसळधार पावसाचा इशारा...
16 मेपर्यंत कर्नाटकात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय 13 ते 14 मेदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.