
पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मान्सून 6 जूनच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून 5 ते 6 दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होताना दिसतोय. तसेच येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.
13 मे 2025 रोजी नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाबाबत माहिती (Advance of Southwest Monsoon 2025) समोर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी मध्यम तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची माहिती नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
नक्की वाचा - Rain Update : मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाकडून इशारा
गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रावर पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची ताकद आणि खोली सातत्याने वाढत आहे. समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीवर या वाऱ्याचा वेग 20 नॉट्सपेक्षा अधिक आहे आणि काही भागांमध्ये ही वारे 4.5 किमी उंचीपर्यंत पोहोचत आहेत. आज 13 मे 2025 रोजी, नैऋत्य मोसमी पावसाने काही भागांमध्ये – दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागांमध्ये प्रवेश केला आहे.
कसा असतो मान्सूनचा प्रवास?
सर्वसाधारणपणे 20 मे किंवा त्यांच्या जवळपासच्या तारखेला अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होतो. त्यानंतर बंगालच्या उपसागरातून मान्सून साधारण 1 जूनच्या जवळपास केरळात येतो. यानंतर मान्सून पुढे सरकत 5 जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, आसान आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होत असतो. यानंतर महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालमध्ये 10 जून आणि त्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तरकडे प्रवेश करतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world