- भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या २०२४ मध्ये २.०६ लाख इतकी नोंदवली गेली
- परराष्ट्र मंत्रालयाने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांची माहिती दिली आहे
- २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये नागरिकत्व सोडणाऱ्यांच्या संख्येत सुमारे पाच टक्क्यांनी घट झाली आहे
मागील काही वर्षांच्या तुलनेत भारतीय नागरिकत्व (Indian Citizenship) सोडणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. पण गेल्या 14 वर्षात भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या विचार करायला भाग पाडणारी नक्कीच आहे. गेल्या वर्षी, म्हणजे 2024 मध्ये, 2.06 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले होते. हा मागील तीन वर्षांतील सर्वात कमी आकडा आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
2022 नंतर भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. गेल्या 14 वर्षांची आकडेवारी (14 Years of Data)परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत दिली. 2011 ते 2024 या दरम्यान भारतीय नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारलेल्या लोकांची माहिती दिली. राज्यसभा खासदार प्रकाश करैत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
गेल्या 5 वर्षांतील आकडेवारी
वर्ष (Year) नागरिकत्व सोडलेली संख्या (Number of People)
- 2020, 85,256
- 2021, 1,63,370
- 2022, 2,25,620
- 2023, 2,16,219"
- 2024, 2,06,378"
संख्यात्मक आढावा (Quantitative Review)
आकडेवारीनुसार, 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये नागरिकत्व सोडणाऱ्यांच्या संख्येत सुमारे 5 टक्क्यांनी (5%) घट झाली आहे. विशेष म्हणजे, 2022 च्या तुलनेत 2023 मध्येही या संख्येत घट दिसून आली होती. यापूर्वी 2019 मध्ये 1,44,017 भारतीयांनी नागरिकत्व सोडले होते. 2011 मध्ये ही संख्या 1,22,819 होती. मागील वर्षांत, या आकडेवारीवरून राजकारण तापले होते. 2020, 2021 आणि 2022 च्या तुलनेत हे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे हाच काय तो सरकारलाठी दिलासा म्हणावा लागेल.