Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' चे हनुमानाशी कनेक्शन! संरक्षणमंत्र्यांनी समजावून सांगितला अर्थ

भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

पाकिस्तानचे दहशतवादी ठिकाणं नष्ट करण्यासाठी भारतीय लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सैन्यानं अद्भुत शौर्य आणि पराक्रमाचं उदाहरण देत नवा इतिहास रचला आहे. भारतीय सैन्यानं अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलतेनं ही कारवाई केली आहे. जे टार्गेट ठरवले होते ते अत्यंत अचुकतेनं नष्ट केले आहेत, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी यावेळी हनुमानाचे देखील स्मरण केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले राजनाथ सिंह?

राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सैन्याला पाठिंबा आणि पुरेसा वेळ दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्याचबरोबर आम्ही आम्ही (भारतीय सैन्य) हनुमानाच्या आदर्शाचं पालन केलं असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हनुमानानं रावणाच्या लंकेतील अशोक वाटिका उद्धवस्त करताना जे केलं तेच भारतीय सैन्यानं केलं. ज्यांनी आमच्या निरापराधांना मारलं त्यांनाच आम्ही मारलं. सैन्यानं कोणत्याही नागरी वस्तीला लक्ष्य केलं नाही, असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. 

( नक्की वाचा : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे मुंबई इंडियन्सची मॅच संकटात? वाचा काय आहे सत्य )

कसं झालं ऑपरेशन सिंदूर?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी 22 एप्रिल रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. 6 मेच्या मध्यरात्री 1.05 ते 1.30 या दरम्यान अवघ्या 25 मिनिटात दहशतवाद्यांच्या 9 तळातील 21 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली.  यावेळी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना धोका होऊ नये यासाठी काळजी घेण्यात आली होती. 

Advertisement

भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या 9 ठिकाणांवर हल्ला करण्यात आला, त्यातील 4 ठिकाणे ही पाकिस्तानातील आहेत. उरलेली 5 ठिकाणे ही पाकव्याप्त कश्मीरमधील आहेत. ही ठिकाणं पाकिस्तानी सीमेपासून 30 ते 100 किलोमीटर आतमध्ये आहेत. 

या हल्ल्यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदकेमधील लश्कर-ए-तोयबाचे मुख्यालय उडवण्यात आले. ही दोन्ही मुख्यालये पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये आहेत.