Jammu and Kashmir Pahalgam attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजधान सिंह यांनी बुधवारी जनतेला संबोधित केलं. काश्मीरच्या पहलगाममध्ये निशस्त्र पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांच्या आकांवर लवकरच प्रहार करण्यात येईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, सरकार प्रत्येक आवश्यक आणि उपयुक्त पावलं उचलेलं. दहशतवादावर प्रहार केला जाईल. ते पुढे म्हणाले, ज्यांनी ही घटना घडवून आणली त्यांच्यापर्यंतच नाही, तर ज्यांनी पडद्यामागे हा रक्तरंजित खेळ खेळला त्यांच्यापर्यंतही पोहोचू. हा पाकिस्तानसाठी एक स्पष्ट इशारा मानला जात आहे.
नक्की वाचा - Jammu Kashmir Pahalgam attack : 'सय्यदच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं होतं', संतोष जगदाळेंच्या मृत्यूने पुणे हळहळलं
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?
मी देशवासियांना आश्वासन देतो की, भारत सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल. भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांपर्यंत तर आपण पोहोचू. मात्र पडद्याच्या मागे बसून भारताच्या जमिनीवर असं दुष्कृत्य करणाऱ्यांनाही सोडणार नाही. भारत ही इतकी जुनी संस्कृती आणि इतका जुना देश आहे की, अशा दहशतवादी कृत्यांनी त्याला घाबरवता येणार नाही. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना लवकरच जोरदार प्रत्युत्तर मिळेल.