दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. केजरीवाल यांचा मतदार संघ असलेल्या नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षासह काँग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसने दिल्लीमध्ये 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. केजरीवाल यांचा मतदार संघ असलेल्या नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिल्लीतील प्रमुख नेते आणि सीईसी सदस्यांनी उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून २१ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बैठकीत काँग्रेसने ईशान्य दिल्लीतील सीलमपूरमधून अब्दुल रहमान यांना तिकीट दिले आहे.

ट्रेंडिंग बातमी - अतुल सुभाषवर जज हसत होते, काकांनी सांगितला तो किस्सा, मृत्यूनंतर पत्नीची आई-भाऊ फरार?

काही दिवसांपूर्वीच त्यांनी आम आदमी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रहमान हे येथील विद्यमान आमदार आहेत. दुसरीकडे 'आप'ने त्यांचे तिकीट रद्द करून झुबेर अहमद यांना दिले आहे. महत्वाचं म्हणजे झुबेर यांनी काँग्रेस सोडून 'आप'मध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने मुस्तफाबादमधून अली मेहदी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. एआयएमआयएमने दिल्ली दंगलीतील आरोपी ताहिर हुसैन यांना मुस्तफाबादमधून तिकीट दिले आहे. 

अली मेहदी हा येथील आमदार हसन अहमद यांचा मुलगा आहे. अली मेहदी 2022 मध्ये चर्चेत आला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि प्रथम आपमध्ये प्रवेश केला, परंतु काही तासांतच त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर पक्षाने चौधरी अनिल कुमार यांना पटपडगंज मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदारही राहिले आहेत. येथून मनीष सिसोदिया यांच्या जागी 'आप'ने शिक्षक अवध ओझा यांना उमेदवारी दिली आहे. तर सध्या विद्यमान नगरसेवक असलेले रविंदरसिंग नेगी यांना भाजपकडून तिकीट मिळू शकते.

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान, काँग्रेसच्या यादीमध्ये आदर्श शास्त्री हे द्वारकामधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. ते पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. आदर्श शास्त्री याआधी आम आदमी पक्षातही होते.  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सीईसी सदस्य अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, टीएस सिंह देव आणि मुशुदन मिस्त्रीही या बैठकीला उपस्थित होते.