दिल्लीतील जामिया नगर भागात एका बारावीच्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार JEE परीक्षेत अपयश आल्याने या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याचं मसोर येत आहे. शुक्रवारी (25 ऑक्टोबर) घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की एक व्यक्ती खाली उभी राहून फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक मुलगी इमारतीवरुन खाली पडते. मुलगी अचानक खाली पडल्याने आजूबाजूला असलेल्या कुणालाच काही कळले नाही.
इमारतीवरून खाली पडल्याने या मुलीचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. विद्यार्थिनीने लिहिलेली सुसाईड नोट घटनास्थळी सापडली आहे. ज्यामध्ये मी स्वत:ला माफ करू शकत नाही, असे लिहिले आहे.
मुलांवर अभ्यासाचं दडपण?
देशाच्या अनेक भागातून अशा प्रकारच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. राजस्थानच्या कोटा येथून अशा घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असतात. जिथे मुले परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्यामुळे किंवा अभ्यासाच्या दबावामुळे आत्महत्या करतात. अलीकडेच एका विद्यार्थ्याने आयआयटी परीक्षेत यश न मिळाल्याने आत्महत्या केली होती.