दिल्ली: राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील नोएडामध्ये भाड्याने राहणाऱ्या दोन तरुणांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या नोएडाच्या सेक्टर-७० मधील बसई गावात दोन तरुणांचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच फेज-३ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून दोन्ही तरुणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले. त्यांना सेक्टर-३९ मधील नोएडा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उपेंद्र (वय, 22) आणि शिवम (वय, २३) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवलेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपेंद्र आणि शिवम छोले-कुलचा आणि भटुरा स्टॉल चालवायचे आणि बसई गावात एका लहान भाड्याच्या खोलीत राहत होते. सकाळच्या तयारीसाठी त्यांनी गॅसवर छोले शिजवण्यासाठी ठेवले होते. मात्र गॅस बंद न करताच दोघे झोपे गेले. रात्रभर गॅस सुरु राहिल्याने छोले जळाले आणि त्याचा धुर संपूर्ण खोलीत पसरला.
या धुरामुळे खोलीत विषारी वायू तयार झाला, ज्यामुळे दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला. सकाळी शेजारी उठले तेव्हा त्यांना त्याच्या खोलीतून धूर येत असल्याचे दिसले आणि त्यांनी पोलिसांना कळवले, ज्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून दोघांना बाहेर काढले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नक्की वाचा - BJP News : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीमध्ये याआधीही दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून बिल्डिंगमधील नागरिक भयभीत झालेत. ही बिल्डिंग भूत बंगला झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. दरम्यान, पोलीस याबाबतचा अधिक तपास करत असून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world