- दिल्ली में महिला सब-इंस्पेक्टर नीतू बिष्ट को 20 लाख रुपये रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया है
- मामले की जांच विजिलेंस विभाग को सौंपी गई है, जो अन्य संभावित शामिल अधिकारियों की भी जांच कर रहा है
- आरोप है कि महिला पुलिसकर्मी नीतू बिष्ट ने 50 लाख रुपये की रिश्वत मांगी थी
Delhi Crime News : दिल्लीच्या पश्चिम विहार पोलीस ठाणे हद्दीतील महिला सब इन्स्पेक्टर नीतू बिष्ट हिला 20 लाख रुपयांची लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. सध्या या तपासाची जबाबदारी दक्षता विभागाकडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, एसआय नीतू बिष्ट सध्या पोलिसांच्या ताब्यात असून तिची चौकशी केली जात आहे.
दक्षता विभागाकडे प्रकरण सोपवलं...
दक्षता विभागाची टीम संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहे. या लाचखोरी प्रकरणात आणखी कोणी अधिकाऱ्यांचा समावेश आहे का, याचाही तपास घेतली जात आहे. विभागीय सूत्रांनुसार, प्रकरणाचं गांभीर्य पाहता कडक कारवाई केली जात आहे आणि भ्रष्टाचारविरोधात झिरो टॉलरन्स स्वीकारली जात आहे. प
50 लाखांची मागितली होती लाच
तक्रारीनुसार, गृह मंत्रालयाशी संबंधित बदली आणि भरती प्रकरणात उपनिरीक्षकाने 50 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, आरोपीने पन्नास लाखांची मागणी केली होती. ज्यापैकी 20.50 लाख रुपये प्राथमिक स्वरुपात दिले जात होते. ही रक्कम तक्रारदारावर दबाव टाकून मागितली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
महिला एसआई पर क्या आरोप
त्यांनी पुढे सांगितलं की, तक्रारदाराने व्यवहाराचे ठोस पुरावे सादर केले. त्यानंतर दक्षता पथकाने सापळा रचला आणि आरोपी अधिकाऱ्याला अटक केली. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, महिला उपनिरीक्षकाने डॉक्टर आणि तिच्या मुलाला पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेले होते. येथे महिला पोलिसाने त्यांना मारहाण केली आणि धमकी दिली. याशिवाय लाचेची रक्कम देण्यासाठी दबाव आणला. आरोपी अधिकारी दिल्ली पोलिसांच्या २०१४ च्या बॅचची आहे. ती पश्चिम विहारमध्ये राहते आणि तिला एका पुरुष सहकाऱ्याने मदत केल्याचा संशय आहे.