Padma Award 2026 : भारत सरकारने २०२६ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा दिवंगत अभिनेता धर्मेंद यांच्यास पाच जणांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर १३ जणांना पद्मभूषण, क्रिकेटर रोहित शर्मा याच्यासह ११३ जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
भारत सरकारने २०२६ वर्षासाठी एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातून कोणाला पद्म पुरस्कार जाहीर...
पद्म विभूषण
धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) – कला
पद्म भूषण
अल्का याज्ञिक – कला
पियुष पांडे (मरणोत्तर) – कला
उदय कोटक – व्यापार व उद्योग
पद्मश्री
डॉ. आर्मिडा फर्नांडिस – वैद्यकीय सेवा
अशोक खाडे – व्यापार व उद्योग
भिकल्या लाडक्या धिंडा – कला
जनार्दन बापुराव बोथे – सामाजिक कार्य
जुझर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी
माधवन रंगनाथन – कला
रघुवीर तुकाराम खेडकर – कला
रोहित शर्मा – क्रीडा
सतीश शाह (मरणोत्तर) – कला
सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग
श्रीरंग देवबा लाड – शेती
पद्मविभूषण मिळालेल्या ५ मान्यवरांची यादी...
धर्मेंद्र सिंग देओल (मरणोत्तर) - कला - महाराष्ट्र
के. टी. थॉमस - सार्वजनिक व्यवहार - केरळ
सुश्री एन. राजम - कला - उत्तर प्रदेश
पी. नारायणन - साहित्य आणि शिक्षण - केरळ
व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) - सार्वजनिक व्यवहार - केरळ
पद्मभूषण (१३)
सुश्री अलका याज्ञिक - कला - महाराष्ट्र
भगतसिंग कोश्यारी - सार्वजनिक व्यवहार - उत्तराखंड कलिपत्ती रामासामी पलानीस्वामी - औषधनिर्माण (Medicine)- तामिळनाडू
मम्मूट्टी - कला - केरळ
डॉ. नोरी दत्तात्रेयुडू - औषधनिर्माण (Medicine) - अमेरिका
पीयूष पांडे (मरणोत्तर) - कला - महाराष्ट्र एस.के.एम. मैलांदन - सामाजिक कार्य - तामिळनाडू शतावधानी आर. गणेश - कला - कर्नाटक
शिबू सोरेन (मरणोत्तर) - सार्वजनिक व्यवहार - झारखंड
उदय कोटक - व्यापार आणि उद्योग - महाराष्ट्र
व्ही. के. मल्होत्रा (मरणोत्तर) - सार्वजनिक व्यवहार - दिल्ली
वेल्लापल्ली नटेशन - सार्वजनिक व्यवहार - केरळ विजय अमृतराज - क्रीडा - अमेरिका
पुरस्कार मिळणाऱ्यांमध्ये १९ महिलांचा समावेश आहे. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींकडून औपचारिक समारंभात प्रदान केलं जाणार आहे. सर्वसाधारपणे प्रत्येक वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या जवळपास राष्ट्रपती भवनात या समारंभाचं आयोजन केलं जातं. पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी, पद्मभूषण उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी, तर पद्मश्री हा कोणत्याही क्षेत्रातील गुणवंत सेवेसाठी दिला जातो. या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते.