Dharmendra Pradhan resigns : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर, आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी कुणाकडे?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharmendra Pradhan resigns : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सूचनेनुसार, कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी अधिसूचनेनुसार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आला आहे.  केंद्र सरकारकडून शनिवारी २५ जुलै २०२६ रोजी सीजेपीच्या सर्व मागण्या मान्य केल्या. केंद्र सरकारने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर नीट वादावरील आपलं आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

प्रल्हाद जोशी यांच्याकडे आधीपासूनच ही मंत्रालयांची जबाबदारी...

प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्र सरकारमधील ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाची जबाबदारी आधीपासूनच आहे. या मंत्रालयांव्यतिरिक्त, ते आता शिक्षण मंत्रालयाच्या कामकाजावर आणि धोरणात्मक निर्णयांवर देखरेख ठेवतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरएसएस पार्श्वभूमीचे असलेले प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाडचे पाच वेळा खासदार आहेत. ते पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात.

Advertisement

नक्की वाचा - CJP च्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा, 'त्या' तिन्ही मागण्या मान्य; शेवटी सौरव दास काय म्हणाला?

पेपरफुटीवरून प्रल्हाद जोशी यांची राहुलवर जोरदार टीका...

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीने दोन दिवसांपूर्वी २३ जुलै रोजी लोकसभेत विरोधी पक्ष नेता राहुल गांधींवर तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितलं की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा जेव्हा प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत, तेव्हा केंद्र सरकारने तत्काळ कारवाई करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली आहे.