जाहिरात

CJP च्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा, 'त्या' तिन्ही मागण्या मान्य; शेवटी सौरव दास काय म्हणाला?

सरकारने सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य केल्यानंतर सीजेपीने आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. 

CJP च्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा, 'त्या' तिन्ही मागण्या मान्य; शेवटी सौरव दास काय म्हणाला?

CJP calls off protest : गेल्या ३५ दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि सीजेपी यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांच्या तिन्ही मागण्या मान्य करीत असल्याचं जाहीर केलं.  याशिवाय सीजेपीकडून सौरव दास यानेही पत्रकारांशी संवाद साधला. 

'त्या'या तिन्ही मागण्या मान्य...

पहिली मागणी - शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

दुसरी मागणी - नीट-युजी 2026 पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आणि गोंधळामुळे ज्या दुर्दैवी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबांना तात्काळ 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि भरपाई देण्यात यावी.

नक्की वाचा - धर्मेंद्र प्रधानांना दुसरं मंत्रिपद मिळणार? राहुल गांधींना कुणाकडून मिळाली इनसाइट माहिती?

तिसरी मागणी - 20 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'चलो संसद' मोर्चादरम्यान आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीमार केला आणि बळाचा वापर केला, त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.

CJP चे आंदोलन मागे...

गेल्या ३५ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला. याशिवाय सरकारने सीजेपीच्या तिन्ही मागण्या मान्य केल्यानंतर सीजेपीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com