PM Modi Speech: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' थांबवलं, असा आरोप विरोधी पक्षांनी वारंवार केला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या प्रश्नाचं उत्तर देण्याचं आव्हान पंतप्रधानांना दिलं होतं. लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वरील चर्चेत बोलताना या प्रश्नाचं पहिल्यांदाच उत्तर दिलं.
काय म्हणाले मोदी?
तप्रधान मोदी म्हणाले की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताचे ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नव्हते.ऑपरेशनदरम्यान 9 तारखेच्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी (जेडी वेंस) माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. ते एक तासभर प्रयत्न करत होते, परंतु मी माझ्या लष्करासोबत बैठक करत होतो. मी त्यांचा फोन उचलू शकलो नाही.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, नंतर जेव्हा मी त्यांना कॉल केला, तेव्हा अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी मला सांगितले की, पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे. माझे जे उत्तर होते, ते ज्यांना समजत नाही त्यांना समजणार नाही. माझे उत्तर होते - जर पाकिस्तानचा हा इरादा असेल, तर त्याला खूप महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला, तर आम्ही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ. हे माझे उत्तर होते. पुढे मी एक वाक्य म्हटले होते - आम्ही गोळीचे उत्तर गोळ्याने देऊ. ही 9 तारखेच्या रात्रीची गोष्ट आहे.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'जगाचा पाठिंबा मिळाला, काँग्रेसचा नाही', राहुल गांधींच्या आरोपांना पंतप्रधानांचं परखड उत्तर )
पाकिस्तानने विनंती केली
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितले की, 9 मेच्या मध्यरात्री आणि 10 मेच्या सकाळी भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात अचूक हल्ला केला, ज्यामुळे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तानने आमच्या डीजीएमओला फोन करून विनंती केली की, तो इतका मार सहन करण्याच्या स्थितीत नाही. कृपया युद्ध थांबवा.
पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानला आधीच शंका होती की भारत मोठी कारवाई करेल. पाकिस्तानकडून अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली जात होती, परंतु भारताने जे ठरवले होते तेच केले. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अवघ्या 22 मिनिटांत प्रत्युत्तर देण्यात आले... 9 मेच्या रात्री आणि 10 मेच्या सकाळी आम्ही पाकिस्तानची लष्करी शक्ती उद्ध्वस्त केली. हेच आमचे उत्तर होते.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'देशात दंगली घडवण्याचे षडयंत्र होते' पंतप्रधान मोदींचा मोठा गौप्यस्फोट )
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तानलाही हे कळून चुकले आहे की भारताचे प्रत्येक प्रत्युत्तर जोरदार असते. त्याला हे देखील माहीत आहे की, भविष्यात वेळ आल्यास भारत काहीही करू शकतो. पंतप्रधानांनी सांगितले की, मी लोकशाहीच्या या मंदिरात पुन्हा सांगू इच्छितो की, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. जर पाकिस्तानने दुस्साहस केले, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे.