3 महिन्यांपर्यंत ऑफिसला दांडी, कोणाच्या लक्षात आलं नाही, मॅनेजरकडूनही कौतुक; कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल

एका कर्मचाऱ्याने Reddit वर आपली एक अनोखी कहाणी शेअर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Remote Work Culture: एका कर्मचाऱ्याने Reddit वर आपली एक अनोखी कहाणी शेअर केली आहे. त्याने सांगितलं की, कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यात दोन दिवस ऑफिसला यायला सांगितलं होतं. सुरुवातील त्याने नियमांचं पालन केलं. रिकाम्या ऑफिसमध्ये तो एकटा बसून झूमवरुन मीटिंग करीत होता. तर बाकीची टीम घरातून लॉगइन करीत होती. 

एक दिवस ट्रेन लेट झाली, त्यामुळे तो ऑफिसला गेलाच नाही. उद्या जाऊ असा विचार केला. मात्र त्यानंतर तो केव्हाच ऑफिसला गेला नाही. तब्बल तीन महिने त्याने ऑफिसची पायरी चढली नाही. दुसरीकडे तो घरातून चांगलं काम करीत होता. डेडलाइन पूर्ण करीत होता, बॉसच्या मेसेजला वेळोवेळी उत्तर देत होता. मात्र त्याची अनुपस्थितीत कोणाच्या लक्षात आली नाही. तीन महिने उलटले तरीही मी ऑफिसला येत नसल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही. तर मीटिंगमध्ये मॅनेजरने त्याचं कौतुक केलं. सध्या तू कामात अधिक व्यग्र असल्याचं म्हटलं, असा अनुभव तरुणाने सांगितला आहे.  

नक्की वाचा - Office Prank: अर्रर्रर्र! तीर्थ म्हणून अख्ख्या ऑफिसला पाजलं असं काही, सगळ्यांचीच पळापळ, VIDEO व्हायरल

हा अनुभव कसा झाला व्हायरल?

Reddit वर एका तरुणाने यासंदर्भातील अनुभव शेअर केला आहे. त्याच्या पोस्टला ३० हजारांहून अधिक वोट्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनींही आपला अनुभव शेअर केला आहे. एका युजरने लिहिलंय, जे लोक प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम सर्वात भारी. मात्र बेजबाबदार कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावणं आवश्यक आहे. 

I quietly stopped going to the office… and no one noticed for 3 months
byu/initial--tadpole inremotework

दुसऱ्या एका युजरने आपली ट्रिक शेअर केली आहे. त्याने लिहिलंय, मी फक्त लॉग इन करायला ऑफिसला जातो. यानंतर घरी येऊन काम करतो. माझ्या बॉसला यात काही अडचण नाही. सद्याच्या डिजिटल युगात कर्मचाऱ्यांनी उपस्थिती नाही तर प्रॉडक्टिविटी महत्त्वाची असेल. लोकांना हे समजलं आहे की, खरी उपस्थिती म्हणजे फक्त ऑफिसला जाणं नव्हे तर वेळेवर कामं पूर्ण करणे आहे.

Advertisement
Topics mentioned in this article