जाहिरात

Office Prank: अर्रर्रर्र! तीर्थ म्हणून अख्ख्या ऑफिसला पाजलं असं काही, सगळ्यांचीच पळापळ, VIDEO व्हायरल

Office Funny Video: नमस्कार करुन तोंडात टाकतात मात्र त्यानंतर ते त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स अशा काही असतात की तुम्हालाही हसू येईल. 

Office Prank: अर्रर्रर्र! तीर्थ म्हणून अख्ख्या ऑफिसला पाजलं असं काही, सगळ्यांचीच पळापळ, VIDEO व्हायरल

Office Prank Viral Video:  कोर्पोरेट जगतातील ऑफिसमध्ये कामासोबतच अनेक गमती- जमती वाद विवाद, सणांचे जंगी सेलिब्रेशन केले जाते. ऑफिसमधल्या या गमती जमतींचे हटके क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये ऑफिसमधील एका तरुणाने आपल्या सहकाऱ्यांशी असा काही प्रँक केला की सगळ्यांचीच तोंडे वाकडी झाली. नेमकं काय आहे हा व्हिडिओ? पाहा... 

कोर्पोरेट जगतात काम करणाऱ्यांसाठी ऑफिस म्हणजे त्यांचं दुसरे घर अन् सहकारी म्हणजे कुटुंबचं.  कामाच्या ताणातूनही प्रत्येक ऑफिसमध्ये सण, उत्सव,  वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सध्या सोशल मीडियावर एका ऑफिसमधील व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या ऑफिसमध्ये पूजा आयोजित केलेली आहे, यावेळी तीर्थ म्हणून काही सहकारी चक्क लिंबाचा सरबत पाजतात, ज्यानंतर कर्मचाऱ्यांच्या रिऍक्शन अगदीच बघण्यासारखी आहेत. 

VIDEO: तब्बल 21 कोटींची म्हैस, प्रदर्शनात कोसळली अन् जीव सोडला; नेटकरी संतापले, पण...

 @eazyonesources या इन्टा अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओमधील ऑफिसमध्ये दिवाळीची सजावट केली आहे आणि पुजाही आयोजित केली आहे. तुम्ही पाहू शकता की, दोन कर्मचारी ग्लासमध्ये लिंबाचा रस पिळत आहेत. त्यानंतर एक सहकारी संपूर्ण ऑफिसमध्ये हा लिंबाचा रस तिर्थ म्हणून वाटत आहे. प्रत्येकजण अगदी आदराने तीर्थ घेण्यासाठी हात पुढे करतात. नमस्कार करुन तोंडात टाकतात मात्र त्यानंतर ते त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स अशा काही असतात की तुम्हालाही हसू येईल. 

m

हा लिंबाचा रस पिल्यानंतर कुणी तोंड वाकडे करताना, कुणी फेकून देत थुंकताना तर कुणी थेट बाथरुमकडे पळताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी जबरदस्त प्रँक आहे, बॉसला पण पाजा असा सल्ला दिला आहे. तर आणखी एकाने आता ऑफिसमध्ये कुणी प्रसादाचे नाव काढणार नाही? अशीही मिश्किल टिप्पणी केली आहे. 

नक्की वाचा: Toxic Work Culture: फक्त 4 मिनिटे लवकर लॉगआऊट.. HR ने हद्दच केली! संतापजनक व्हॉट्सअ‍ॅप चॅट VIRAL

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com