PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या आवाहनांबाबत देशभरात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय अनेकांनी चिंताही व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं भारतीयांना आवाहन केलं आहे. मात्र पंतप्रधान असं का म्हणाले, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय परिणाम होऊ शकतो यासंदर्भातील विश्लेषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलंय. मात्र जर भारतीयांना वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर त्याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेसह विविध घटकांवर दिसून येतील. भारत हा जगातला सोन्याच्या ग्राहक देशांपैकी सर्वात मोठा ग्राहक आहे. अगदी लग्नसमारंभ ते गुंतवणुकीपर्यंत भारतीयांचं सोन्यासोबत अतिशय घट्ट नातं आहे. मात्र वर्षभर सोनं खरेदी न केल्यास सोन्याची आयात कमी होईल. त्यामुळे परकीय चलनाची बचत होईल. तसंच बँका आणि शेअर बाजारालाही फायदा होणार आहे.
वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल?
भारतीयांची वर्षभराच्या सोन्याची मागणी 600 ते 800 टन इतकी आहे. 2025 मधील सोन्याची मागणी 710.9 टन इतकी होती. म्हणजे यंदा सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गोल्ड बार, नाणी, ETF मधल्या गुंतवणुकीतही झपाट्याने वाढ झाली आहे. खरेदी कमी केली किंवा थांबवल्यास देशाच्या आयात खर्चावर परिणाम होईल. सोन्याची आयात कमी झाल्याने परकीय चलनाची बचत होईल. डॉलरची मागणी कमी होईल आणि रुपयावरचा दबाव घटू शकतो.
देशातला पैसा परदेशात जाण्याऐवजी देशांतर्गत वापरता येईल. सोने खरेदीऐवजी बँका, एसआयपीमध्ये शेअर बाजार, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा. यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक फायदा होईल आणि बँकांकडे अधिक भांडवल उपलब्ध होईल. उद्योगांना कर्ज मिळेल, रोजगारही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.