ऋतिक गणकवार, प्रतिनिधी:
Flight Ticket Price Cut: इराण - अमेरिका युद्धामुळे इंधन शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीनंतर विमान प्रवास महागल्याच्या मुद्यावर विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आता देशभरातील विमानतळांवरील पार्किंग व लैंडिंग शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, यामुळे देशांतर्गत विमान तिकिटे २५ टक्क्यांनी कमी होण्याचे संकेत आहेत.
Mia Khalifa: लेबनानमधील हल्ल्यांनंतर मिया खलीफाला अश्रू अनावर; अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप
विमानाचा प्रवास होणार स्वस्त?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे महाग झालेला विमान प्रवास आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा ठरणार आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे विमान इंधनाचे दर वाढले होते, ज्याचा फटका विमान कंपन्यांसह प्रवाशांनाही बसत होता. मात्र, केंद्र सरकारने आता मध्यस्थी करत विमानतळांवरील पार्किंग आणि लँडिंग शुल्कात २५ टक्के कपात करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे देशांतर्गत विमान तिकिटांचे दर २५ टक्क्यांनी कमी होण्याची चिन्हे असून सर्वसामान्यांचे 'उडण्याचे' स्वप्न पुन्हा स्वस्त होणार आहे.
मुंबई, दिल्ली, पुणे यांसारख्या देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांवरील आर्थिक ताण कमी होणार असून, ही सवलत थेट प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना राबवली जाणार आहे. पश्चिम आशियातील विस्कळीत विमान सेवेमुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही मार्गांवर तिकिटांचे दर वाढले होते. मात्र, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यटनाला आणि व्यापार क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(नक्की वाचा- Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)